SRH vs DC : प्ले ऑफ शर्यतीत हैद्राबाद टिकणार का?

SRH vs DC : प्ले ऑफ शर्यतीत हैद्राबाद टिकणार का?

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आज सनराईझर्स हैद्राबाद (sunrisers hyderabad) संघासमोर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) संघाचे कडवे आव्हान असणार आहे...

आयपीएल २०२१ च्या पहिल्या पूर्वार्धात दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाची कामगिरी युवा कर्णधार रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात दिल्लीने उल्लेखनीय ठरली होती. दिल्लीने आपल्या पहिल्या ८ सामन्यांमध्ये ६ विजय आणि २ पराभवांसह १२ गुणांसह पहिल्या स्थानी धडक मारली होती.

मात्र आता यूएईत (UAE) आयपीएल (IPL) पुन्हा परतले आहे. त्यामुळे रिषभ पंतचे शिलेदार पहिल्या हाफप्रमाणे विजयी मोहीम कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे पहिल्या हाफमध्ये खेळू शकला नव्हता. मात्र श्रेयस अय्यर संघात परतल्यामुळे संघाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.

गोलंदाजीत कागिसो रबाडा (Kagiso Rabada), आवेश खान (Avesh Khan) फॉर्मात आहेत. शिवाय दक्षिण आफ्रिकेचा एन्रिक नॉरकिया परतल्यामुळे संघाची गोलंदाजी अधिक बळकट झाली आहे.

दिल्ली आणि हैद्राबाद संघांच्या हेड टू हेड कामगिरीत एकूण १९ सामन्यांमध्ये हैद्राबाद (SRH) संघाने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ सामने दिल्ली कॅपिटल्स संघाने जिंकले आहेत. मात्र असे असले तरी गत ४ सामन्यांमध्ये दिल्लीने हैद्राबाद संघावर मात केली आहे.

आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई (Chennai) येथे झालेल्या सुपर ओव्हर (Super Over) सामन्यात दिल्लीने हैद्राबाद संघाला नमवले होते. आज होणाऱ्या सामन्यात पराभवाची परतफेड करण्याची संधी हैद्राबाद संघाकडे आहे. त्याचा फायदा घेण्यात हैद्राबाद यशस्वी होणार का? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

हैद्राबाद संघ २ गुणांसह आठव्या स्थानी आहे. बाद फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हैद्राबाद संघाला विजय आवश्यक असणार आहे. मात्र हैद्राबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेरस्टो याने माघार घेतली आहे.

बेरस्टोच्या जागी विंडीजच्या शेरफेन रुदरफोर्ड याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हैद्राबाद संघात यष्टीररक्षक फलंदाज म्हणून रिद्धिमान सहा किंवा जेसन रॉय डावाची सुरूवात करण्याची शक्यता आहे.

हैद्राबाद संघाच्या नेतृत्वात नियमित कर्णधार डेविड वॉर्नरच्या जागी केन विलियम्सन याला संधी देण्यात आली आहे. त्याच्या कर्णधारपदात संघाने २०१८ साली अंतिम फेरी तर २०१९ मध्ये बाद फेरीत स्थान मिळवले होते.

शिवाय हैद्राबाद संघाच्या फलंदाजीची भिस्त डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनीष पांडे, जेसन रॉय, प्रियम गर्ग आहेत. अष्टपैलूंमध्ये केदार जाधव, अभिषेक शर्मा, विजय शंकर, मोहंमद नाबी, जेसन होल्डर आहेत. गोलंदाजीत बेसिल थंपी, संदीप शर्मा, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि रशीद खान आहेत.

दिल्ली संघाच्या फलंदाजीची मदार शिखर धवन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मीथ, श्रेयस अय्यर, शिमररोन हेटमायर आहेत. अष्टपैलूंमध्ये मार्कस स्ट्रोइनीस, आर अश्विन, अक्षर पटेल, टॉम करण, ललित यादव आहेत. गोलंदाजीत ईशांत शर्मा, आवेश खान, रबाडा, प्रवीण दुबे, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, रिपाल पटेल, बेन डॉरशियास, एल मेरीवाला, अमित मिश्रा आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com