MI vs SRH : सनरायझर्स हैद्राबाद मुंबईचे गणित बिघडवणार?

MI vs SRH : सनरायझर्स हैद्राबाद मुंबईचे गणित बिघडवणार?

अबू धाबी | Abu Dhabi

आयपीएल २०२१ मध्ये (IPL 2021) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासमोर सनराईझर्स हैद्राबादचे (Sunrisers Hyderabad) तगडे आव्हान असणार आहे...

आजच्या सामन्यावर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचे विशेष लक्ष असणार आहे. सध्या गुणतालिकेत कोलकाता १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. मुंबईला (MI) बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे.

मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना २० षटकात २०० पेक्षा अधिक धावा करून सामना किमान १७० धावांनी जिंकावा लागणार आहे. कोलकाता संघाने आपल्या अखेरच्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघावर ८६ धावांनी मोठा विजय मिळवल्यामुळे मुंबई इंडियन्स मोठ्या संकटात सापडला आहे.

सर्वच फलंदाजांना आक्रमक खेळ करावा लागणार आहे. तर गोलंदाजांना अचूक मारा करावा लागणार आहे. दुसरीकडे अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघावर थरारक विजय मिळवल्यामुळे हैद्राबाद (SRH) मुंबईवर वर्चस्व राखणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.