टेबल टेनिस : मुंबईचा रेगन विजयी तर मुलींमध्ये मारली रिशा मिरचंदानीने बाजी

टेबल टेनिस : मुंबईचा रेगन विजयी तर मुलींमध्ये मारली रिशा मिरचंदानीने बाजी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

८३ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत (Table Tennis championship) २१ वर्षाखालील मुलांच्या गटात पहिला मानांकित ए. रेगन (A. Reagan) याने टीएसटीएच्या अक्षय पिसाळचा (Akshay Pisal) ११-६, ११-९, ११-८, १५-१७, ११-६ असा ४-१ ने पराभव करून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला...

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याच्या ७ व्या मानांकित जितेंद्र यादव (Jitendra Yadav) याने ठाण्याच्याच दिद्धेश सावंतचा अटीतटीच्या सामन्यात१२-७, ७-११,९-११, १४-१२, ८-११, १२-८, ११-४ असा ४-३ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम फेरीत मात्र अनुभवी रेगनने ठाण्याच्या जितेंद्र यादवचा अत्यंत सहजपणे ११-९, १०-१२, ११-, ११-३, ११-३ असा ४-१ पराभव करून सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले तर जितेंद्र यादव ने रजतपदक (Silver Medal) पटकावले.

२१ वर्षा खालील मुलींच्या गटात बिगर मानांकित टीएस्टीएची रीशा मिरचंदाणी (Risha Mirchandani) हिने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी ठाण्याच्या आर्या संगेडकरचा एकतर्फी झालेल्या सामन्यात ६-११, १६-१४,११-४, ११-५, ११-९ असा ४-१ ने पराभव करून आपली अंतिम फेरीतील घोडदौड चालू ठेवली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील ठाण्याच्या ७ वी मानांकित इशा चव्हाणने आपल्याच जिल्ह्याच्या आद्यश्री जोगचा ११-८,७-१२, ११-५,११-९,११-८ असा ४ विरुद्ध १ गेमने पराभव करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. परंतु तो आनंद फार काळ टिकवता आला नाही.

टीएसटीएच्या रीशा मीरचंदानीने ठाण्याच्या इशा चव्हाण विरुद्ध ११-७, ११-९, ११-९ असे सरळ तीन गेम घेऊन आपला दबाव कायम ठेवला.


चौथ्या गेम मध्ये १०-७ असे इशा चव्हाणकडे लीड असतांना मिरचंदाणी हिने सरळ ३ पॉईंट घेऊन १०-१० अशी बरोबरी साधली आणि शेवटी १५-१३ असा सामना जिंकून ४-० असा विजय मिळवून २१ वर्षाखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवून सुवर्ण पदक पटकावले.

इशा चव्हाणला रजत पदकावर समाधान मानावे लागले. २१ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटाचे विजेतेपद सबअर्बन टेबल टेनिस असोसिएशन मुंबईने आपणाकडे राखत दोन्ही सुवर्णपदके आपल्या खात्यात जमा केली.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ भूषण पटवर्धन, सोनी गिफ्ट्सचे नितीन मुलतानी, राज्य संघटनेचे सचिव यतीन टिपणीस, सि.आर. शहा विभागीय सहनिबंधक, नासिक विभाग व जेष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिसपटू प्रकाश केळकर यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस यांनी नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेने कोविडची परिस्थिती असतांनाही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून खेळाडूंसाठी या स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन मिलिंद कचोळे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com