राज्यस्तरीय स्पर्धेत दिसली नाशिकची 'पॉवर'

राज्यस्तरीय स्पर्धेत दिसली नाशिकची 'पॉवर'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत (State level power lifting competition) नाशिकच्या खेळाडूंनी नाविन्यपूर्ण कामगिरी करत पॉवर दाखवून दिली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर येथे या स्पर्धा नुकत्याच खेळवण्यात आल्या. या स्पर्धेसाठी नाशिकच्या पॉवर लिफ्टर्सकडून २० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात प्रत्येक खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली...

वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग इंडियाच्या मान्यतेने अमॅच्युअर पॉवर लिफ्टिंग (Amature power lifting) असोसिएशन महाराष्ट्र आणि वेदांत फिटनेस यांच्या वतीने राज्यस्तरीय बेचप्रेस आणि डेडलिफ्ट वैयक्तिक चॅम्पिअनशिप २०२१ चे आयोजन करण्यात आले होते.

यात ज्युनिअर पुरुष (२३ वर्षां खालील) संघात रजत इघे यांनी रौप्य व कांस्य, जयेश झाल्टे सुवर्ण, झाकीर याकूब कांस्य, समाधान धनगर रौप्य व कांस्य ज्युनिअर महिला ( २३ वर्षांखालील) संघात माधवी पोतदार सुवर्ण व कांस्य, दिया सगरे २ रौप्य,

सायली बहारे यांनी २ सुवर्ण पदके पटकावली. सिनियर पुरुष ( ४० वर्षां खालील ) संघात अमोल म्हसळे यांनी रौप्य, ज्ञानेश्वर म्हस्के २ सुवर्ण, ज्ञानेश्वर जरे रौप्य व कांस्य , नरेंद्र कुलकर्णी सुवर्ण व रौप्य, आशय रानडे २ सुवर्ण, अजय देसाई सुवर्ण, अब्रार इनामदार यांनी सुवर्ण व कांस्य पदके पटकावली. मास्टर पुरुष (४० वर्षां पुढील) अविनाश पठारे यांनी २ सुवर्ण आणि मास्टर महिला (४० वर्षां पुढील) संघ डॉ. नमिता कोहोक (Dr Namita Kohok) यांनी २ सुवर्ण पदके पटकावली.

समाधान शिंदे याना ३ वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा आघात सहन करावा लागला त्यावर मात देऊन त्यांनीही या स्पर्धेत डेडलिफ प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच माधवी पोतदार ( ज्युनिअर ) आणि अजय देसाई ( सिनियर ) यांनी पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस प्रकारात सगळ्यात जास्त वजन उचलून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्ट्रॉंग गर्ल आणि स्ट्रॉंग मॅन हा मानाचा 'किताब मिळवून नाशिक जिल्ह्याचे नामांकित खेळाडू होण्याचा बहुमान कमावला. या सर्व संघाला प्रशिक्षक आशय रानडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.