राज्य ज्युनिअर मास्टर टेनिस स्पर्धेस सुरुवात

राज्य ज्युनिअर मास्टर टेनिस स्पर्धेस सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना ( Maharashtra State Lawn Tennis Association)व नाशिक जिल्हा टेनिस संघटना( Nashik District Tennis Association) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे राज्य ज्युनिअर 12 वर्ष वयोगटातील मास्टर्स टेनिस स्पर्धेस ( Masters Tennis Tournament)सुरुवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा संघटनेचे ज्येष्ठ संस्थापक सदस्य तसेच वयस्क गटातील सत्तर वर्ष वयोगटातील राष्ट्रीय द्वितीय मानांकित टेनिस खेळाडू धवलचंद्र पटेल यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य टेनिस संघटनेचे व्हाईस चेअरमन राजीव देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. स्पर्धा प्रमुख डॉ. संजय पिंचा यांनी स्पर्धेची माहिती देतांना तीन दिवस चालणार्‍या स्पर्धेत बारा वर्षे वयोगटातील मुले व मुली महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय गुण प्राप्त अव्वल प्रत्येकी आठ अशा 16 खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे.

राऊंड रॉबिन पद्धतीने लीग मॅचेस खेळवले जातील. सहभागी खेळाडूंना टी-शर्ट, पाण्याच्या बॉटल्स, सहभाग प्रमाण पत्र, विजेते, उपविजेते व उपांत्य फेरीतील खेळाडूंना 56 हजाराची रोख पारितोषिके चषक व प्रशस्ती पत्रक देण्यात येतील. याप्रसंगी पौर्णिमा पटेल, जिल्हा संघटना सचिव अद्वैत आगाशे, राष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील, स्पर्धा निरीक्षक अपूर्वा रोकडे, एकनाथ किनिकर, यती गुजराथी उपस्थित होते.

प्रवेश पात्र खेळाडू

12 वर्षाखालील मुले : दक्ष पाटील (पुणे ), जय गायकवाड (सोलापूर), प्रद्नेश शेळके (पुणे), दर्श खेडेकर (मुंबई), ऋषिकेश माने (नवी मुंबई), धु्रव सेहगल (नवी मुंबई), वरद उन्द्रे (पुणे), मनन राय (मुंबई)

12 वर्ष मुली : पार्थ सारथी मुंडे (सोलापूर), स्वनीका राय (पुणे), ईशान पठाण (मुंबई), वंदिका राजपूत (औरंगाबाद), रितिका दावलकर (कोल्हापूर), रीतसा कोंडकर (पुणे), जानवी चौगुले (इचलकरंजी).

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com