भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचे सावट

भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचे सावट

कोलंबो | Colombo

भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला दि.१३ जुलैपासून कोलंबोच्या आर प्रेमदासा मैदानावर (R. Premadasa Ground, Colombo) सुरुवात होणार आहे. मात्र ही मालिकाच आता रद्द करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे...

मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी श्रीलंका संघात कोरोनाने (Corona) शिरकाव केला आहे. श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर (Sri Lankan batting coach Grant Flower tested corona positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आता विलगीकरणात (Separation) ठेवण्यात आले आहे.

नुकताच इंग्लंडविरुद्ध (England) मालिका खेळून मायदेशात परतलेला श्रीलंका संघ सध्या विलगीकरणात आहे. संघातील इतर खेळाडूंना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

श्रीलंका क्रिकेट संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे श्रीलंका संघातील इतर खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह (Corona Report Negative) आला आहे. मंगळवारी इंग्लंडविरुध्दची मालिका संपवून सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मायदेशात परतले.

त्यानंतर संघातील सर्व खेळाडू आणि इतर सपोर्ट स्टाफची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) करण्यात आली. खेळाडूंना आता क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.

कोलंबो येथील हॉटेलमध्ये सर्व खेळाडू सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून खेळाडू सरावास सुरुवात करू शकतील. असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे (Sri Lanka Cricket Board) प्रमुख अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

१२ जुलै रोजी सर्व खेळाडूंचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईल. त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com