दानुष्का गुणथिलकाला श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा दणका!

दानुष्का गुणथिलकाला श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा दणका!

दिल्ली | Delhi

श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दानुष्का गुणथिलकाला बलात्काराच्या प्रकरणात सिडनी पोलिसांनी अटक केली. या अटकेमुळे टी २० वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली.

श्रीलंकेच्या टीमने शनिवारी इंग्लंडविरोधात वर्ल्डकपमधील अखेरचा सामना खेळला होता. या मॅचनंतर काही वेळातच पोलिसांनी गुणथिलकाला अटक केली. आता श्रीलंका क्रिकेट बोर्डने दानुष्काला दणका दिला आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दुनुष्का याची सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून हकालपट्टी केली आहे. श्रीलंका क्रिकेट कार्य समितीने हा निर्णय घेतला. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुनाथिलका याला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली होती. त्याचा आता पुढच्या निवडीसाठी विचार केला जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेट झालेल्या २९ वर्षीय तरूणीने दनुष्का गुणतिलकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिडनीमध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दनुष्काला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. २९ वर्षांच्या तरूणीने तिच्या घरात तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. यानंतर स्टेट क्राइम कमांड आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला असंही ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटलं आहे.

अटकेच्या कारवाईनंतर श्रीलंका संघ त्याला मागे सोडून मायदेशी रवाना झाला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंका संघासह ऑस्ट्रेलिया दाखल झालेला गुणतिलका जखमी झाल्याने संघाबाहेर गेला होता. अशीन बंडाराने संघात त्याची जागा घेतल्यानंतरही तो संघासह थांबला होता.

गुणतिलकाने १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये नुकतंच नामिबियाविरोधात खेळलेल्या टी-२० सामन्याचाही समावेश आहे. या सामन्यात संघाचा पराभव झाला होता. गुणतिलकावर २०१८ मध्येही असाच आरोप झाला होता. यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण तपासानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली होती आणि त्याच्या मित्राला अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com