IPL21 : हैद्राबाद राजस्थान विजयाच्या मार्गावर परतणार ?

सॅनरायझर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आजचा सामना
IPL21 : हैद्राबाद राजस्थान विजयाच्या मार्गावर परतणार ?

नवी दिल्ली | New Delhi

आयपीएल २०२१ मध्ये आज रविवारी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईझर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

हैद्राबाद संघाने आपलं कर्णधारपद आता केन विलियम्सनकडे सोपवलं आहे. यंदाच्या हंगामात हैद्राबाद संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. संघाला आपल्या ६ सामन्यांमध्ये १ विजय आणि ५ पराभवांसह २ गुणांवर अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. आता केन विलियम्सनच्या नेतृत्वात नव्याने भरारी घेण्यासाठी हैद्राबाद सज्ज झाला आहे.

केन विलियम्सनच्या नेतृत्वात हैद्राबाद संघाने २०१८ मध्ये अंतिम फेरीत तर २०१९ मध्ये बाद फेरीत धडक मारली होती. हैद्राबाद आणि राजस्थान आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत.

त्यात हैद्राबाद संघाने ७ तर राजस्थान रॉयल्सने ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला असल्यामुळे नेमका कोणता संघ बाजी मारतो ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

संघाला मागील ६ सामन्यांमध्ये २ विजय आणि ४ पराभवांसह ४ गुणांची कमाई करता आली आहे. आता हैद्राबादवर विजय संपादन करून स्पर्धेतील तिसऱ्या विजयासाठी राजस्थान सज्ज आहे. तर दुसऱ्या विजयासाठी हैद्राबाद सज्ज आहे.

दोन्ही संघांसाठी आयपीएल २०२१ मधील आपलं आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा असणार आहे. विजयी संघाला स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखण्याची संधी मिळणार आहे. हैद्राबाद संघ राजस्थान रॉयल्स संघाच्या तुलनेत अधिक संतुलित दिसत आहे.

- सलिल परांजपे, नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com