IPL21 : सनराईझर्स हैद्राबाद विजयाचे खाते उघडणार?

आजच्या सामन्यात कोणाची बाजू सरशी?
IPL21 : सनराईझर्स हैद्राबाद विजयाचे खाते उघडणार?

चेन्नई । Chennai

आयपीएल २००२१ मध्ये आज बुधवारी सनराईझर्स हैद्राबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करून विजयाचे खाते उघडण्यासाठी हैद्राबाद सज्ज आहे.

चेन्नई येथे झालेले पहिले ३ सामने हैद्राबाद संघाने गमावले आहेत. सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर होणार आहे. दुबईमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी १-१ विजय साकारला होता.

मुंबईविरुद्ध सामन्यात ३ परदेशी खेळाडू खेळवण्याचा निर्नय हैद्राबाद संघाला चांगलाच महागात पडला होता. शिवाय संघाचा मधल्या फळीतील भरवश्याचा फलंदाज केन विलियम्सन दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाच्या अडचणीत वाढ झाले . आजच्या सामन्यात विजय संपादन करून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी हैद्राबाद काय रणनीती आखतो ? यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे .

पंजाब संघाने राजस्थान रॉयल्सवर मात करून हंगामाची विजयी सुरुवात केली होती. मात्र चेन्नई सुपरकिंग्जने पंजाबला २० षटकात १०६ आशा माफक धावसंख्येवर रोखून शानदार विजयाने पंजाबचा सहज पराभव केला होता.

मात्र दिल्लीविरुद्ध सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार लोकेश राहुलने १२ षटकात ११२-० धावसंख्येपर्यंत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र इतर फलंदाजांनी पत्करलेल्या हरकिरीमुळे आणि गोलंदाजांच्या निष्प्रभ्र माऱ्यामुळे आणि ढिसाळ क्षेत्रक्षणामुळे पंजाबने दिल्लीविरुद्ध हार पत्करली होती. ह्या पराभवातून सावरून नव्या उमेदीने हैद्राबादवर तुटून पाडण्यासाठी पंजाब आज मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास हैद्राबाद संघ संतुलित दिसून येत आहे.

हैद्राबाद संघासाठी जमेची बाजू म्हणजे मनीष पांडे , जॉनी बेरस्टो , डेविड वॉर्नर फॉर्मात आहेत. त्यांना आपल्या फलंदाजीत सातत्य राखणे आणि इतर फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे . शिवाय हैद्राबाद संघासाठी डोकेदुखी म्हणजे केन विलियम्सन सध्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे अंतिम ११ मध्ये डेविड वॉर्नर , जॉनी बेरस्टो , रशीद खान , यांचा सहभाग निश्चित आहे. मात्र चौथ्या विदेशी खेळाडूसाठी जेसन रॉय , जेसन होल्डर , केन विलियम्सन असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे चौथा परदेशी खेळाडू कोण ? असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उपस्थित आहे.

हैद्राबाद संघाच्या फलंदाजीची मदार जेसन रॉय, डेविड वॉर्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन, जॉनी बेरस्टो, वृद्धिमान सहा प्रियम गर्ग यांच्यावर अवलंबून आहे अष्टपैलूंमध्ये जेसन होल्डर, मोहंमद नाबी, अभिषेक शर्मा, केदार जाधव, विजय शंकर आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, बासिल थंपी, रशीद खान, शाबाझ नदीम, सिद्धार्थ कौल, जगदीश सूचित, खालील अहमद आहेत.

पंजाब संघाच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल, मयंक अगरवाल, क्रिस गेल , निकोलस पुरण, डेविड मलान, शाहरुख खान, सार्फराझ खान आहेत. अष्टपैलूंमध्ये मंदीपसिंग, मोझेस हेन्रीक्स, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, फेबियन अलेन, झाये रिचडसन, जलाज सक्सेना आहेत. गोलंदाजीत क्रिस जॉर्डन , ईशान पोरेल, रवी बिष्णोई, मोहंमद शमी, दर्शन नळकांडे आहेत .

- सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com