दिल्ली l Delhi

इंडियन प्रीमिअर लीगचा (IPL) १४ व्या हंगामाचा लिलाव गुरुवारी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी चेन्नईत होणार आहे. या लिलावासाठी आठही फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएलच्या उद्या होणाऱ्या लिलावासाठी सारेच खेळाडू आणि चाहते उत्सुक आहेत. मात्र त्यातच चेन्नईच्या एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू फॉफ डू प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना त्याचा कसोटीतील एक फोटो शेअर करत त्याचे निवृत्ती घेत असल्याचे प्रसिद्धी पत्रक शेअर केले आहे. तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की ‘माझे मनात निर्णय स्पष्ट आहे आणि नव्या अध्यायाकडे जाण्यासाठी ही योग्य वेळ आहे.’

याबरोबरच त्याने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘या वर्षाने सर्वांनाच अनेक गोष्टींचा पुन्हा विचार करायला लावला आहे. माझ्याबाबतही अनेक गोष्टी या दरम्यान स्पष्ट झाल्या. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या देशासाठी सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याबद्दल मला अभिमान आहे. पण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची माझी वेळ आली आहे. जर कोणी मला १५ वर्षांपूर्वी सांगितले असते की मी दक्षिण आफ्रिकेसाठी ६९ कसोटी सामने खेळणार आहे आणि संघाचे नेतृत्वही करणार आहे, तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. माझ्या कसोटी कारकिर्दीबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमुळेच मी आज अभिमानाने एक व्यक्ती म्हणून उभा आहे. तसेच, पुढील काळात टी२० विश्वचषक होणार असल्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करायचे असल्याचेही डू प्लेसिसने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर डू प्लेसिसने त्याच्या प्रसिद्धीपत्रकात अखेर सर्वांचे आभार मानले आहेत. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत योगदान दिलेल्या प्रत्येकाचे तसेच कुटूंबाचे आभार मानले आहेत. याबरोबरच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे, प्रशिक्षकांचे, संघ सहकाऱ्यांचे, सपोर्ट स्टाफचे देखील आभार त्याने मानले आहेत.

ड्यू प्लेसिसने नोव्हेंबर २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात आपले पदार्पण केले होते आणि शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी येथे खेळला होता. त्याने त्याची खूप खराब कामगिरी होती यात सिरीजमध्ये त्याने १०, २३, १७ आणि ५ धावाा काढल्या होत्या. कसोटी सामन्यामध्ये ड्यू प्लेसिसने ४०.०२ च्या सरासरीने ४,१६३ धावा केल्या असून १० शतके आणि २१ अर्धशतके आपल्या नावावर केली आहेत. ड्यु प्लेसिसच्या नावावर एकही द्विशतक नाही. गेल्या वर्षी सेंचुरियन येथे श्रीलंकेविरूद्ध त्याने १९९ धावांवर बाद झाला होता. एकूण ६९ कसोटी सामन्यात त्याने द. आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले.