शुभमन गील इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीला मुकणार

जगदीशन ईश्वरनला मिळणार संधी
शुभमन गील इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीला मुकणार

मुंबई | Mumbai

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन (Shubhman Gill) गीलला पायाला (गुडघ्याच्या खालच्या भागात) गंभीर दुखापत (Serious injury0 झाली आहे.त्यामुळे त्याला किमान २ महीने क्रिकेटपासून दूर राहावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुरुवारी बीसीसीआय (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील ५ कसोटी (FIve Test Series) सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम (Nottingham) येथे सुरुवात होणार आहे. या कसोटीत शुभमन गील सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुभमन गीलला शिन स्ट्रेस फ्रॅक्चर (Shin stress fracture) आहे. त्यामुळे तो किमान २ महिन्यांसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल , मयांक अगरवाल किंवा जगदीशन ईश्वरन याला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम ११ चा चमू निवडताना मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल या दोघांपैकी एकाच्या नावावर अधिक विश्वास दाखवला जाऊ शकतो.

शिन स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय ?

शिन स्ट्रेस फ्रॅक्चर फार गंभीर नसून , यातून सावरण्यासाठी नियमित विश्रांती आणि रिह्याबिलिटेशनची गरज आहे. या फ्रॅक्चर मधून बाहेर पडण्यासाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

कोण आहे अभिमन्यू ईश्वरन ?

पूर्ण नाव अभिमन्यू रंगनाथन परमस्वरन ईश्वरन.(Abhimanyu Inshwaran) जन्म ६ सप्टेंबर १९९५ वय २५ देहरादून फलंदाजीची (Batsman) शैली उजव्या हाताचा फलंदाज. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बंगाल (West Bangal) संघाचे प्रातिनिधीत्व. प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये खेळलेल्या ५८ सामन्यांमध्ये ४२२७ धावा काढल्या आहेत. त्याने १३ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत. सर्वाधिक स्कोर २३३ टी २० सामने १९ ४२७ धावा १ शतक १ अर्धशतक.

-सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com