आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी टीम इंडियात नाशिकच्या दोघी

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी टीम इंडियात नाशिकच्या दोघी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मस्कत येथे होणाऱ्या डब्लूटीटी युथ कंडेंडर १५ व १७ वर्ष वयोगटाखालील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी (international table tennis competition) नाशिकच्या सायली वाणी (sayali wani) व तनिशा कोटेचा (tanisha kotecha) यांची निवड झाली आहे...

या स्पर्धा आजपासून १६ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून नाशिकच्या टेबल टेनिसपटूची राज्य व राष्ट्रीयस्तरावर कामगिरी उल्लेखनीय होत आहे.

नाशिकच्या दोन मुली एकाचवेळी भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत ही नाशिकसाठी अभिमानास्पद बाब आहे. या स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, संजय वसंत, सतीश पटेल, अलीअसगर आदमजी व अभिषेक छाजेड, जय मोडक आदींनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com