
नाशिक । प्रतिनिधी Nashik
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया ( Table Tennis Federation of India)आणि भारतीय खेल प्राधिकरण (Sports Authority of India ) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 या दरम्यान इन्दोर येथे होणार्या खेलो इंडिया टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या तनिशा कोटेचा ( Tanisha Kotecha )हिची निवड झाली. यापूर्वी तनिशाची गुवाहाटी व पंचकूला (हरियाणा) येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धा मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटाच्या होणार आहेत.
एकेरीकरीता देशातील 19 वर्षाखालील गटातील पहिल्या बारा मानांकित मुले व मुलींचा यात समावेश आहे. या गटात तनिशा ही देशात चौथी मानांकित खेळाडू आहे. या स्पर्धेत ती आणि रीशा मीरचंदानी (टिएसटिटिए) दुहेरीमध्ये खेळणार आहेत.
तनिशा ही जय मोडक यांच्या मार्गशनाखाली सराव करत आहे. याशिवाय रीशा मीरचंदानी (टिएसटिटिए) व पृथा वर्टिकर (पुणे), जेनिफर वर्गीस (नागपूर) या महाराष्ट्रातील या तीन खेळाडूंचीही या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर मुलांमध्ये जश मोदी (टिएसटिटिए) व निल मुळे (पुणे) यांचीही निवड झाली आहे.