भारतीय टेबल टेनिस संघात नाशिकच्या खेळाडूची निवड

भारतीय टेबल टेनिस संघात नाशिकच्या खेळाडूची निवड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दि. २ ते ८ डिसेंबरदरम्यान पोर्तुगाल (Portugal) येथे होणाऱ्या आईटीटीएफ वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपसाठी (ITTF World Youth Championship) १५ वर्षाखालील मुलींच्या गटात सहभागी होणाऱ्या भारतीय संघाची घोषणा टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने (Table Tennis Federation of India) केली आहे...

या संघात नाशिकच्या सायली वाणीची (Sayali Vani) निवड करण्यात आली आहे. भारतीय टेबल टेनिस (Table Tennis) संघाचे या पूर्वीही सायली हिने प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेपूर्वी या संघातील खेळाडूंचे सराव शिबिर २० ते २९ नोहेंबर या कालावधीसाठी दिल्ली येथे होणार आहे.

तेथूनच भारतीय संघ पोर्तुगालला रवाना होणार आहे. या संघात नाशिकच्या सायली वाणीबरोबर पुण्याची पृथा वर्टीकर, हरियाणाची सुहाना सैनी व दिल्लीच्या कासवी गुप्ता यांचा समावेश भारतीय संघात आहे.

या स्पर्धेत भारताबरोबर जपान, जर्मनी, उक्रेन, रशिया, मॉरीशस, अमेरिका, पोर्तुगाल देशाचे संघ सहभागी होणार आहे. सायलीने जानेवरी २०२१ मध्ये इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १५ वर्षाखालील मुलींच्या गटाचे राष्ट्रीय अजिंक्यपद मिळविले होते. या वर्षी तीने ट्यूनीशिया, ओमान, हंगेरी, व स्लोवाकिया येथे झालेल्या डब्लूटीटी युथ कंडेंडर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांच्या हस्ते सायलीचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू तनिशा कोटेचा व प्रशिक्षक जय मोडक यांचादेखील सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, संजय मराठे आदी उपस्थित होते. तिच्या निवडीबद्दल हंगामी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, राज्य टेबल टेनिस संघटनेचे संजय कडू, प्रकाश जसानी, रामलू पारे, विवेक आळवणी, राकेश पाटील, संतोष पवार आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com