सौरव गांगुली
सौरव गांगुली
क्रीडा

सौरव गांगुलीचा मोठा भाऊ करोना बाधित; 'दादा' होम क्वारंटाइन

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहाशीष गांगुली यांना करोनाची लागण

Nilesh Jadhav

कोलकाता | Kolkata

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहाशीष गांगुली यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळेच सौरव गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ”गेल्या काही दिवसांपासून स्नेहाशीष गांगुली यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काल रात्री त्यांचा करोना अहवाल आला. स्नेहाशीष गांगुली पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सुरक्षिततेची काळजी म्हणून सौरव गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे.” तसेच सौरव गांगुलीसह कुटुंबातील सर्व सदस्यांची लवकरच तपासणी करण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com