
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पार्टनर हमवतन रोहन बोपन्ना यांना ऑस्ट्रेलिया येथील मिक्स डबलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे....
यामुळे सानियाचे ग्रँड स्लॅम जिंकून करिअरमधून निवृत्त होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ग्रँड स्लॅमचा फायनल सामना मेलबर्न येथील रॉड लेवर एरेना येथे खेळण्यात आला. सानिया आणि बोपन्ना यांच्या जोडीला लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस या ब्राजीलियन जोडीने ६-७ (२) २-६ पराभूत केले आहे.
पराभवानंतर सानियाला अश्रू अनावर झाले. सानियाने घोषणा केली आहे की, फेब्रुवारीमध्ये दुबईत होणाऱ्या डब्ल्यूटीए टूर्नामेंट तिच्या करिअरमधील शेवटची टूर्नामेंट असेल.
सानिया मिर्झाने स्वतःला सावरत माईक हातात घेतला आणि सर्वांचे आभार मानले. तसेच विजेत्या जोडीचे अभिनंदन केले. त्यानंतर सानिया म्हणाली, 'माझ्या करिअरची सुरुवात मेलबर्नमधून २००५ साली झाली. ग्रँड स्लॅमचा निरोप घेण्याची यापेक्षा उत्तम जागा असूच शकत नाही. डोळ्यात पाणी आल्यामुळे तिने सर्वांची माफी मागितली. सानिया मिर्झाचा हा भावुक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.