टेनिसपटू सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय; अखेरचा सामना कुठे खेळणार?

टेनिसपटू सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय; अखेरचा सामना कुठे खेळणार?

मुंबई | Mumbai

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कौटुंबिक कारणांनी कायम चर्चेत राहिली आहे. या चर्चांदरम्यान सानिया मिर्झाने एक मोठी घोषणा केली आहे. सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे.

पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पिअनशिप ही अखेरची असल्याचे सानियाने म्हटले आहे. ही चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा WTA १००० कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया अखेरची खेळताना दिसणार आहे. ३६ वर्षीय सानिया मिर्झाही दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर १ राहिली आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय; अखेरचा सामना कुठे खेळणार?
Air India च्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा 'तो' विकृत गजाआड

सानियाने गेल्या वर्षीच ती २०२२ च्या अखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून निवृत्त होणार आहे.

सानिया मिर्झाचा जन्म १५ नोव्हेंबर १९८६ रोजी मुंबईत झाला. सानियाने लहान वयातच टेनिसचा सराव सुरू केला. तिचे पहिले टेनिस गुरू माजी खेळाडू महेश भूपती आहेत. ज्यांनी सानियाला टेनिसचे सुरुवातीचे धडे दिले. नंतर, सानियाने सिकंदराबाद येथील सिनेट टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि नंतर ती अमेरिकेत गेली. तिथे तिने एस टेनिस अकादमीमध्ये प्रवेश केला.

टेनिसपटू सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय; अखेरचा सामना कुठे खेळणार?
खळबळजनक! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

सानिया मिर्झाने १९९९ मध्ये जकार्ता येथील जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली होती. नंतर २००३ मध्ये विम्बल्डन चॅम्पियनशिप मुलींच्या दुहेरीतही विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्याच वर्षी ती यूएस ओपन मुलींच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली. सानियाने आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ सुवर्णपदके जिंकली. सुरुवातीला सानिया एकेरीतही भाग घ्यायची.

एकेरीत सानियाने २००५ आणि २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची तिसरी फेरी गाठली होती. तसेच, सानियाने २००५, २००७, २००८ आणि २००९ मध्ये विम्बल्डनची दुसरी फेरी गाठली. हीच तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. २००५ मध्ये, सानियाने यूएस ओपनची चौथी फेरी गाठली होती. ही या स्पर्धेतील तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली. त्याचवेळी फ्रेंच ओपनमध्ये सानियाने २००७ आणि २०११ मध्ये दुसरी फेरी गाठली होती. एकेरीत फारसे यश न मिळाल्यानंतर सानियाने दुहेरीत हात आजमावला.

टेनिसपटू सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय; अखेरचा सामना कुठे खेळणार?
मुंबई विमानतळावर ३१.२९ कोटींचं ड्रग्ज जप्त; ड्रग्ज लपवण्यासाठी असं काही केलं की VIDEO पाहून हादराल

२००९ मध्ये, सानियाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. यानंतर तिने २०१२ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०१४ मध्ये यूएस ओपन मिश्र दुहेरीत विजेतेपद जिंकले. सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीत जवळपास ६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. मिश्र दुहेरीशिवाय सानियाने महिला दुहेरीतही तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

सानियाने ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सानिया एकेरीत पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती. तर महिला दुहेरीत ती दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचली होती. याशिवाय २०१६ मध्ये तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत भाग घेतला आणि उपांत्य फेरी गाठली होती. सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री (२००६), खेलरत्न (२०१५) आणि पद्मभूषण (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय; अखेरचा सामना कुठे खेळणार?
आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात, घातपाताचा संशय

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com