भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सचिन तेंडूलकरचे ट्वीट चर्चेत

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सचिन तेंडूलकरचे ट्वीट चर्चेत

मुंबई | Mumbai

भारत-पाकिस्तानचा संघ (India vs Pakistan)मागच्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) आज आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) निमित्ताने पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. परंतु १० महिन्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत...

आजच्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी दोन्ही संघावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच भारताचा महान क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) भारताला शुभेच्छा दिल्या असून सामन्याआधी एक ट्वीट केले आहे.

सचिनने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज रात्री होणाऱ्या रोमांचक मुकाबल्याची आतुरतेने वाट पाहत आहे. याचसोबत त्याने २००३ वर्ल्ड कपचा एक फोटोही शेअर केला आहे. २००३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतरचा हा फोटो आहे.

तसेच २००३ वर्ल्ड कपच्या (2003 World Cup) सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध २७३/७ इतका स्कोअर केला होता. या आव्हानाचा पाठलाग भारताने ४५.४ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून पार केला. त्यावेळी सचिन तेंडुलकरने ९८ रनची ऐतिहासिक खेळी केली होती.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने त्याच्या करियरमध्ये पाकिस्तानविरुद्ध अनेक आठवणीतल्या खेळी केल्या आहेत. आपल्या करियरचा अखेरचा वनडे सामनाही सचिनने पाकिस्तानविरुद्ध आशिया कप २०१२ मध्ये खेळला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com