National Sports Day निमित्त सचिन तेंडुलकरचा खास संदेश; म्हणाला..

आज अनेक मान्यवरांनी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त शुभेच्छा दिल्या आहे.
National Sports Day निमित्त सचिन तेंडुलकरचा खास संदेश; म्हणाला..

मुंबई | Mumbai

भारताचे दिग्गज हॉकीपटू ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांची आज जयंती. त्यांचा जयंती निमित्त २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. आज अनेक मान्यवरांनी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त शुभेच्छा दिल्या आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील शुभेच्छा देत खास संदेश दिला आहे.

सचिन तेंडुलकरने(Sachin Tendulkar) ट्विट सोबत एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. सचिनने ट्विट करत म्हंटले आहे की, "खेळ फक्त मजेसाठी नसून त्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फीट होता. त्यामुळे स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना दररोज काहीवेळ खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या." तसेच "खेळामुळे आपण भारताला अधिक हेल्थी आणि फीट करण्यास मदत करु" असा संदेश देखील त्याने दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com