Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर @50, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर @50, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई | Mumbai

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्याचा 50 वा वाढदिवस (50th birthday) साजरा करण्यासाठी सहकुटुंब गोव्याला गेला आहे. सचिनचा आज 24 एप्रिलला 50वा वाढदिवस आहे. दरवर्षी सचिनचे चाहतेही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करतात. सचिन यावेळी त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन गोव्यात करणार आहे.

सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत गोव्याला गेला आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहे. Tea time:50 Nout Out! अशी पोस्ट सचिनने शेअर केली आहे. गोवा विमानतळावर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासोबत दिसला. यावेळी सारा एका महिला चाहतीसोबत सेल्फी काढताना दिसली. त्यांचा विमानतळावरचा फोटोही व्हायरल होत आहे.

रविवारी सायंकाळी किल्ले निवती किनारपट्टीवर निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी सचिन आपल्या परिवारासह दाखल झाला होता. यावेळी त्याने येथील स्थानिक लोक आणि मच्छीमारांसोबत संवाद साधला. पुढील दोन-तीन दिवस तेंडुलकर आपल्या परिवारासह पर्यटनाचा आनंद घेण्याची शक्यता आहे.

सचिनने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, तर 2013 मध्ये त्याने कारकिर्दीतील शेवटच्या सामना खेळला. त्याच्या या 24 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने क्रिकेटविश्वात अनेक विक्रम केले.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 34 हजारहून जास्त धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम आहे. सचिनला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आलं आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com