Sachin Tendulkar Birthday : सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी.. कुठे झाली पहिली भेट?

Sachin Tendulkar Birthday : सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी.. कुठे झाली पहिली भेट?

क्रिकेटचा देव.. मास्टर ब्लास्टर.. भारतरत्न आशा अनेक उपाध्यांनी गौरवला गेलेल्या खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन तेंडुलकर. आपल्या जबरदस्त खेळाने त्याने 24 वर्षे (1989-2013) क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवले आहे.

अशा सचिनचा आज 50 वा वाढदिवस. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या या वाटचालीत त्याची कायमच साथ दिली ती पत्नी अंजली यांनी. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया सचिन- अंजली यांची खास फिल्मी लव्हस्टोरी..

मुंबई एअरपोर्टवर पहिल्यांदा पाहिले

अंजलीने सचिनला पहिल्यांदा 1990 मध्ये मुंबई एअरपोर्टवर पहिल्यांदा पाहिले. तेव्हा सचिन पहिल्या इंग्लंड टूर हून मायदेशी आला होता. एअरपोर्टवर अंजलीदेखील आईला रिसीव्ह करण्यासाठी पोहोचली होती. अंजली आईची वाट पाहात होती. तेवढ्यात तिची नजर सचिनवर पडली आणि ती त्याला पहातच राहिली. मात्र जेव्हा तिला कळले की, इंग्लंडविरूद्ध नुकतीच सेंच्युरी फटकावणारा हाच तो भारताचा युवा क्रिकेटर आहे. तेव्हा ती एयरपोर्टवरच त्याच्या मागे पळत गेली हेती. एका मुलीला आपल्यामागे पळताना पाहून सचिन एकदम लाजला. एवढेच नाही तर तो लाजतच कारमध्ये बसला होता.

Sachin Tendulkar Birthday : सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी.. कुठे झाली पहिली भेट?
“दादा ज्याचं जळतं…”, सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना खरमरीत पत्र; ६ प्रश्न विचारून केली कोंडी

फोनवर झाले बोलने

आता अंजलीला सचिनला बोलाण्याची आणि भेटण्याची इच्छा होत होती. मित्रांच्या माध्यमाने तिने सचिनचा फोन नंबर मिळवला आणि ती त्याला बोलली. अंजलीने सचिनला सांगितले की तिने सचिनला एअरपोर्टवप पाहिले होते. यावर सचिन म्हणाला - 'हो, मी पाहिले होते. तु माझ्या मागेही पळत होती.'

पत्रकार होउन पोहोचली होती अंजली...

एक मजेशिर प्रसंग आहे. तेव्हा सचिन आणि अंजलीच्या मैत्रीला नुकतीच सुरुवातच झाली होती. अंजलीने एका इंटरव्यूमध्ये हा किस्सा सांगीतला होता. ती म्हणाली होती की, एकदा सचिनला भेटण्यासाठी ती स्वतःला पत्रकार सांगूण त्याच्या घरी पोहोचली होती. घरि अचानकपणे एक महिला पत्रकार आल्यामुळे तेव्हा सचिनचे कुटुंबीय चकित झाले होते. सचिनच्या आईने अंजलीला विचारले की, तू खरोखरच पत्रकार आहेस? या आधी सचिनच्या आईने सचिनला अंजलीला चॉकलेट गिफ्ट देताना पाहिले होते. या मुळेच त्यांना शंका आली होती.

Sachin Tendulkar Birthday : सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी.. कुठे झाली पहिली भेट?
MPSC संयुक्त परीक्षेचे ९० हजारांपेक्षा जास्त हॉल तिकीट Telegram वर लीक... आयोगाचे काय स्पष्टीकरण ?

अवघड व्हायचे बोलने

सचिन साधारणपणे परदेशातच टूरवर राहायचा तेव्हा न इंटरनेट होते ना एसएमएसची सुविधा. कॉलिंगरेटदेखील फार दास्त होते. तेव्हा सचिनबरोबर फोनवर बोलायला फार कष्ट करावे लागत.

अंजलीनेच केली होती लग्नाची बोलनी

सचिन तेव्हा न्यूझिलंड टूरवर होता. अंजलीने सचिनच्या कुटुंबीयांशी लग्नाची बोलनी केली होती. हा संपूर्ण प्लॅन सचिनचाच. त्याला स्वतःलाच घरात हा विषय काढायची भिती वाटत होती. सचिन या गोष्टीचा खुलासा करताना म्हणाला होता की, अंजलीबरोबर लग्नाच्या विषयावर घरच्यांशी बोलणे म्हणजे जगातील सर्वात वेगवान बॉलरचा सामना करण्यापेक्षाही अवघड गोष्ट होती. यामुळे मी ही जबाबदारी अंजलीवरच टाकली होती.

Sachin Tendulkar Birthday : सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी.. कुठे झाली पहिली भेट?
हरणाला वाचवण्याच्या नादात पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

आधीच झाली असती भेट, पण...

खरेतर, मुंबई एअरपोर्टवर झालेल्या भेटी आधी अंजलीने सचिनला भेचायची संधी गमावली होती. हा किस्सा खुद्द अंजलीनेच सांगितला आहे, सचिन जेव्हा स्टार क्रिकेट क्लबबरोबर लंडन येथे खेळत होता, तेव्हा मीदेखील इंग्लंडमध्येच होते. तेव्हा माझे वडिल मला म्हणाले होते की, ते मला एका क्रिकेटरला भेटवणार आहेत. मला क्रिकेटमध्ये रस नव्हता त्यामुळे मी सचिनला भेटाने नाकारले होते. तेव्हा सचिन केवळ 15 वर्षांचा होता.

अंजली आणि सचिन यांचे अफेअर साधारणपणे पाच वर्ष चालले. मे, 1995 मध्ये सचिन-अंजलीचा विवाह झाला. या लग्नाला काही निवडक लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा 22 वर्षांचा सचिन स्टार झाला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com