श्रीशांतला IPL खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार

यंदाच्या IPL लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे
श्रीशांतला IPL खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार

दिल्ली l Delhi

१८ फेब्रुवारीला होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. या लिलावासाठी हजारहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती. यामध्ये भारतातील ८१४ खेळाडू आणि २८३ परदेशी खेळाडूंनी नोंदणी केली होती.

दरम्यान, यंदा IPL च्या लिलावासाठी श्रीसंतने नाव नोंदणी केली होती. त्याने स्वत:ची बेस प्राइस ७५ लाख इतकी ठेवली होती. याआधी किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या श्रीसंत टीम इंडियाच्या २००७ आणि २०११च्या विजेत्या संघात होता. पण या वर्षी आयपीएल लिलावाच्या खेळाडूंच्या अंतिम यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मागील महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतून तो भारतीय क्रिकेटमध्ये परतला होता.

आयपीएल २०१३ च्या हंगामावेळी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहभाग असल्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. परंतु, न्यायालयीन लढ्यानंतर ती शिक्षा सात वर्षे करण्यात आली. या सातवर्षांच्या बंदी नंतर तो पुन्हा घरगुती क्रिकेटमध्ये परतला होता आणि त्याने आयपीएलसाठी देखील नोंदणी केली होती, परंतु बीसीसीआयने त्याला लिलावसाठी निवडले नाही. तसेच ३८ वर्षाच्या श्रीशांतला टी२० क्रिकेट आवडत पण आकडेवारीनुसार तो अद्यापही हवा तसा मॅचमध्ये फिटनेस साध्य करू शकलेला नाही. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील तितकेच महत्त्वाचे असून इतक्या महिन्यांनी तो परतत असल्याने क्षेत्ररक्षणात तो कितपत चांगला असावा असा प्रश्न असल्याने त्याची निवड लिलावासाठी झालेली नसावी.

दरम्यान, हरभजन सिंग, केदार जाधव आणि ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड या आठ परदेशी खेळाडूंची सर्वाधिक २ कोटींच्या गटात निवड झाली आहे. तर, १.५ कोटीच्या बेस प्राइसमध्ये एकूण १२ विदेशी खेळाडू आहेत. याखेरीज १ कोटीच्या बेस प्राइसमध्ये ११ खेळाडू असून त्यामध्ये २ भारतीयांचा समावेश आहे. तसेच १५ विदेशी खेळाडू ७५ लाखांच्या बेस प्राइस प्रकारात आहेत. तर ५० लाख रुपयांच्या वर्गात ६५ खेळाडू असून त्यामध्ये १३ भारतीय खेळाडू आणि ५२ विदेशी खेळाडू आहेत. तर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन, भारताचा कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजारा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबूशेनला लिलावात सामील करण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com