मिनी मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील धावपटूंचा सहभाग

दिव्यांगांनी गाजवली स्पर्धा
मिनी मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील धावपटूंचा सहभाग

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशन(Sinnar Athletic Association )आणि सिन्नर इंडस्ट्रीयल अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या ( Sinnar Industrial and Manufacturers Association)वतीने आयोजित करण्यात आलेल्या 17 व्या जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ( Sinnar Mini Marathon Competition)राज्यभरातून आलेल्या 560 धावपटूंनी भाग घेतला. स्पर्धेत दिव्यांगांसाठी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. त्यात पाच दिव्यांग बांधवांनी भाग घेतला.

येथील आडवा फाटा येथे सकाळी 6.30 वाजता सीमाचे अध्यक्ष किशोर राठी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिंदाल कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अजय विदयभानू, तुलसी आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. पाटील, श्रीनाम फाऊंडेनचे अध्यक्ष भारत सोनवणे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे, निवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे, असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे उपस्थित होते.स्पर्धेत साकूर फाटा येथील आधारतीर्थ आश्रममधील 25 मतिमंद खेळाडूंनीही भाग घेतला. स्पर्धेत राज्यासह भोपाळमधील चार, हरियाणामधील चार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेमधील खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा निकाल असा

(प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा या क्रमाने) मुलांच्या दहा किलोमीटर स्पर्धेत (खुला गट)- अंकित कौशिक, संदीप चौधरी, सागर सदगीर, महेश पखाने, अजय देशमुख. तर मुलींमध्ये राणी मुचंडी, अर्चना, जाधव, रंजना पटेल, पूनम वालवे, भारती गोडे

मुले आणि पुरुषांच्या दहा किलोमीटर वेट रन स्पर्धेत- अशोक पवार, भिकू खैरनार, माणिक निकम, बद्रीप्रसाद वाबळे, पुंडलिक झगडे.

बारा वर्षांआतील मुले (तीन किलोमीटर)-प्रतीक बोरसे, महेश चौधरी, अजय माळी, सिद्धेश राठोड, आदित्य खेलुकर. तर मुलींमध्ये-आरोही बरकले, दिव्यानी चौधरी, गुजर शर्मा, प्रणिता पडनेरे, अश्विनी चव्हाण.

14 वर्षांआतील मुले (पाच किलोमीटर)-तुषार माशी, अजय राठोड, गोविंद पाडेकर, दादाभाऊ चव्हाण, स्वराज चव्हाण. तर मुलींमध्ये सानिका चौधरी, भारती चौधरी, राणी चव्हाण, आदित्य खाडे, प्राची सुहानी.

18 वर्षाआतील मुले (पाच किलोमीटर)- विकासकुमार बिंड, अतुल चिबडे, प्रवीण चौधरी, सचिन वाळवे, सुरेश चौधरी. तर मुलींमध्ये- नम्रता चौधरी, तेजस्विनी चौधरी, लाजो सरोज, अस्मिता बोरे, स्वाती हागवणे.

मुली व महिलांच्या पाच किलोमीटर वेट रन स्पर्धेत- डॉ.ज्योती मोरे, रेखा पवार, प्रतिभा क्षत्रिय, सविता फड, एकता कुलथे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com