राऊंड द विकेट : सुसंस्कृत क्रिकेट जिंकले

राऊंड द विकेट : सुसंस्कृत क्रिकेट जिंकले

डॉ. अरुण स्वादी

डेरील मिचेल कोण? हा प्रश्न यापुढे कोणीही विचारणार नाही. किमान इंग्लिश क्रिकेटप्रेमी तरी त्याला कायम स्मरणात ठेवतील. इंग्लंडसाठी Enland तो काळ ठरला. मात्र तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला, असं काही झालं नाही. तो सलामीला आला. त्याने बराच वेळ पाहिलं, तो थांबला आणि योग्य वेळी तलवार फिरवून तो जिंकला. या विजयाने डेरील मिचेलच्या न्यूझीलंडने New Zealand पुराना हिशेबही चुकता केला. विश्वचषक 2019 मधल्या पराभवाचा करकचून बदला घेतला.

अर्थात हे आपण म्हणायचं. कारण न्यूझीलंड बदल्यासाठी कधीच खेळत नाही. ते सज्जन माणसांचं क्रिकेट खेळतात. त्याची झलक काल पाहायला मिळाली. निशामने मारलेला फटका मिचेलमध्ये आल्यामुळे गोलंदाज रशीदला अडवता आला नाही. ही धाव आरामात निघाली असती, पण डेरिलने निशामला पळायला नकार दिला.

हा उपांत्य फेरीचा सामना होता. प्रत्येक धाव महत्वाची होती. परमेश्वरानेही त्यांना दाद दिली. कारण पुढच्याच चेंडूवर निशामने षटकार मारला. जिमी निशमही या विजयाचा तेवढाच मानकरी ठरावा. 4 षटकांत 59 धावा सोप्या नव्हत्या, पण जिमीचे उत्तुंग छक्के आणि मग मिचेलने त्याची पुनरावृत्ती केली. किविजनी हरलेला सामना आरामात जिंकला. गप्तिल विल्यमसन म्हणजे न्युझीलंड म्हणणार्‍यांना चांगली चपराक मिळाली.

इंग्लंडचा स्कोअर तसा समाधानकारक होता, पण या विकेटवर 180 धावा व्हायला पाहिजे होत्या, असे त्यांना वाटत असेल. थोडे क्रेडिट किवी गोलंदाजांना द्यावे लागेल. मात्र या सामन्यात दव पडलेलं दिसलं नाही. अगदी शेवटी ते पडलं, पण इंग्लंडच्या पराभवाचे ते कारण नव्हते. इंग्लिश फलंदाज मसिक्स हिटरफ आहेत.

या सामन्यात त्यांनी काही सिक्स मारल्या, पण सिक्स हिटिंगसाठी किवी इतके प्रसिद्ध नाहीत. गप्तील व निशाम याला अपवाद, पण निशामने पहिलाच चेंडू मैदानाबाहेर भिरकावला, मग छक्क्यांची बरसात केली आणि सामना गरागरा फिरवला. सभ्य व सुसंस्कृत क्रिकेट पुन्हा जिंकले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com