रोहित शर्माला ‘खेलरत्न’
क्रीडा

रोहित शर्माला ‘खेलरत्न’

दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा Rohit Sharma याला यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. Rajiv Gandhi Khel Ratna Award

त्याच्यासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, 27 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, 15 खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले.

यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी या पाच खेळाडूंची शिफारस तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत क्रीडापटूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. या आधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला 1998 साली, धोनीला 2007 तर विराटला 2018 साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

2019 विश्वचषकात रोहित शर्माने 5 शतकं झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं. भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरातील क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सन्मान केला जातो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com