न्यूझीलंडविरुद्ध टी २० मालिकेसाठी रोहित कर्णधार; अशी आहे 'टीम इंडिया'

न्यूझीलंडविरुद्ध टी २० मालिकेसाठी रोहित कर्णधार; अशी आहे 'टीम इंडिया'

मुंबई | Mumbai

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ (ICC WTC 20 2021) मध्ये भारतीय संघाला साखळीतच गाशा गुंडाळून मायदेशी परतावे लागले आहे....

शिवाय कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (indian coach ravi shasri) यांचा कार्यकाळ संपला आहे, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यांत टी २० वर्ल्डकप होणार आहे.

म्हणून भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ मायदेशात ३ टी २० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

येत्या १७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

संघाचे कर्णधारपद ५ वेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माच्या खांदयावर सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपद लोकेश राहुल सांभाळणार आहे.

शिवाय २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीतून विराट कोहलीला (Virat kohali) विश्रांती देण्यात आली आहे. तर पहिल्या कानपुर येथे होणाऱ्या कसोटीत रोहित शर्मा (Rohti Sharma) भारताचं नेतृत्व करणार आहे.

तर उपकर्णधारपद अजिंक्य राहणेकडे कायम असणार आहे. कसोटी संघाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

टी २० मालिकेसाठी भारतीय संघात अष्टपैलू वयंकटेश अय्यर (Vyanktesh Ayyar), हर्षल पटेल (Harshal Patel) आवेश खान (Awesh Khan) या युवा खेळाडूंना भारताचं प्रातिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

तसेच भारतीय संघात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) , जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) , विराट कोहली (Virat Kohali) , आणि मोहंमद शमी (Mohammad Shami), हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) विश्रांती देण्यात आली आहे. तसेच फिरकीपटू युझवेन्द्र चहल (Yajuvendra chahal) संघात परतला आहे. तर विश्वचषकात संधी मिळूनही अपयशी ठरलेल्या राहुल चाहर (Rahul chahar), आणि वरुण चक्रवर्तीला (Varun Chakrawarti) संघातून वगळण्यात आले आहे.

तर यष्टीरक्षक ईशान किशन (Ishan kishan) आणि रिषभ पंतचं (Rishabh pant) संघातील स्थान कायम आहे. राहुल द्रविड यांनी जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव , श्रेयस अय्यर , ऋतुराज गायकवाड , लोकेश राहुल, ईशान किशन, रिषभ पंत, वयंकटेश अय्यर, आर अश्विन, युझवेन्द्र चहल, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहंमद सिराज आणि आवेश खान.

- सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com