२५व्या दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या खेळाडूची निवड

महाराष्ट्राच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी शशांक वझे यांच्याकडे
२५व्या दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या खेळाडूची निवड

नाशिक | Nashik

२५ व्या नॅशनल डेफ सीनियर स्पोर्ट्स (Sports) चॅम्पियनशिप ऑर्गनासएड बाय ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ संचलित राष्ट्रीय टेबल टेनिस (Tennis) चॅम्पियनशिप इंदौर (Indore) (मध्यप्रदेश) एमरल हाइट्स इंटरनॅशनल स्कूल येथे 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 दरम्यान संपन्न होणार आहेत. स्पर्धा 16 वर्षांखालील मुले-मुली, पुरुष व महिला खुला गट तर सांघिक, एकेरी आणि डबल्स या प्रकारात खेळविण्यात येणार आहेत.

त्याबरोच 16 वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकच्या रिया कुलकर्णी या खेळाडूची निवड झाली आहे. महाराष्ट्राकडून (Maharashtra) प्रतिनिधित्व करणारी पहिलीच मूक व कर्णबधिर (दिव्यांग) टेबल टेनिस (Table tennis) खेळाडू असल्याचे प्रशिक्षक शशांक वझे यांनी सांगितले.

२५व्या दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या खेळाडूची निवड
चाकूने दहशत माजवणाऱ्यावर पोलिसांची ओपन फायरिंग, थरारक VIDEO कॅमेऱ्यात कैद

रिया कुलकर्णी (Riya Kulkarni) ही यशवंत व्यायामशाळेच्या (Yashwant Gymnasium) टेबल टेनिस हॉल मध्ये नियमित सराव करत असून तिच्या व प्रशिक्षक शशांक वझे यांच्या निवडीबद्दल हितचिंतकांनी अभिनंदन केले,

२५व्या दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या खेळाडूची निवड
Video : अजगर जंगलाच्या राजाला चावतो तेव्हा...; थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष श्री दीपक पाटील, महाराष्ट स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ चे मानद सचिव गोपाळ बिरारे, सल्लागार राजेंद्र शिंदे, कशिश छाब्रा, क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, आनंद खरे, अविनाश ढोली आदि मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com