आयपीएलचे उर्वरीत सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?

आयपीएलचे उर्वरीत सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?

मुंबई | Mumbai

आयपीएल च्या उर्वरीत सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयला विंडो मिळाली असल्याचं समोर आलं आहे. येत्या १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान उर्वरीत ३१ सामन्यांचे आयोजन यूएईत केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार २०२० चा संपूर्ण हंगाम यूएईत आयोजित करण्यात आला होता. यावर्षी सर्व सामन्यांचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आलं होतं.

भारतात बायो बबलमध्ये करोनाने शिरकाव केल्यानंतर संपूर्ण स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आयपीएल आयोजनासाठी इंग्लंड , श्रीलंका , यूएई या देशांनी बीसीसीआयसमोर आयपीएल आयोजनासाठी प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे २९ मे रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत या तिन्ही स्थळांबद्दल विचार केला जाण्याची शक्यता आहे. पण सर्वाधिक पसंती यूएईला दिली जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयचे अंतरिम सीईओ आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात बीसीसीआयच्या महत्वपूर्ण बैठकीत आयपीएलच्या उर्वरीत ३१ सामन्यांच आयोजन यूएईत करण्यात यावे यासाठी बैठकीत आपला प्रस्ताव सादर करणार आहेत .

स्पर्धा यूएईत आयोजित करण्याचे तीन फायदे आहेत

१ कमी खर्च : आयपीएल सामन्यांचे आयोजनासाठी यूएई हा उत्तम पर्याय आहे. कारण येथे बीसीसीआयला हॉटेल , मैदाने यांचा खर्च इंग्लंड अँड वेल्सच्या तुलनेमध्ये बीसीसीआयला परवडणारा ठरू शकतो. याशिवाय यूएईत सर्व संघाना रस्त्याने थेट मैदानापर्यंत पोहचता येऊ शकेल. हाच खर्च इंग्लंडमध्ये वाढण्याची शक्यता आहे.

येथील ट्रॅव्हलिंगचा खर्च बीसीसीआयला परवडणार नाही.

२ इंग्लंडमधील हवामान इंग्लंडमध्ये आयपीएल सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्याचा फटका बीसीसीआयला बसू शकतो. यूएईत सप्टेंबर महिन्यात हिवाळा असतो. हे वातावरण खेळाडूंसाठी योग्य आहे. तर इंग्लंडमध्ये या कालावधीमध्ये पावसाळा असल्यामुळे स्पर्धेतील जास्तीत जास्त सामने पावसाच्या अडथळ्यामुळे रद्द करावे लागतील.

३यूएईत सामने आयोजित करण्याचा अनुभव :आयपीएल २०१४ चा सुरुवातीचा टप्पा आणि २०२० चा संपूर्ण हंगाम बीसीआयने यूएईत आयोजित केला होता.

हा अनुभव बीसीसीआयकडे असल्यामुळे बीसीसीआयला उर्वरीत सामन्यांच्या आयोजनात कोणतीही अडचण येणार नाही. तर इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही आयपीएल आयोजित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आयपीएल इंग्लंडमध्ये करायचं ठरल्यास बीसीसीआयला अनेक संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

- सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com