
नाशिक । प्रतिनिधी Nashik
उद्योजक व कामगार यांचे आरोग्य अबाधित राखण्यास आयमातर्फे विश्वास लॉन्स येथे आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेत रेनायसन्स संघाने अंतिम फेरीत कनेक्ट इंडियाचा चुरशीच्या लढतीत पराभव करून अजिंक्यपदकासह करंडक तसेच 21 हजारांचे प्रथम पारितोषिक पटकाविले. अभिषेक व्यास यांनी हे पारितोषिक स्वीकारले.
उपविजेत्या संघास मिळालेले 11000 रुपयाचे बक्षिस हर्षद बेळे यांना प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रॉयल इंकचे वाजीद देशमुख यांची निवड झाली. सहा सामन्यात त्यांनी 10 बळी घेतले. अंबर फोर्जचे सुमीत गायकवाड उत्कृष्ट फलंदाज ठरले. त्यांनी 5 सामन्यांत 142 धावा केल्या. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा किताब आकाश देवरे याने पटकावला. रेनायसन्सचे दीपक मिश्रा यांची सामनावीर म्हणून निवड झाली.
आयमा बॉक्स क्रिकेट स्पर्धेत 20संघानी भाग घेतला होता. राउंड रॉबिन पध्दतीने सामने झाले. आयामा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, गोविंद झा, राधाकृष्ण नाईकवाडे, करन सिंग पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
आयमाच्या क्रीडा समितीचे चेअरमन जयंत पगार, राहुल गांगुर्डे, हर्षद बेले, अभिषेक व्यास, धीरज वडनेरे यांनी स्पर्धेच्या यशस्वीत्यासाठी विशेष परिश्रम घेतले. बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या हस्ते झाले होते. यावेळी बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, माजी चेअरमन धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे हेही उपस्थित होते.