IPL21 : आरसीबी-दिल्ली पाचव्या विजयासाठी सज्ज

IPL21 : आरसीबी-दिल्ली पाचव्या विजयासाठी सज्ज
RCB vs DC

अहमदाबाद | Ahamdabad

आयपीएल २०२१ मध्ये आज मंगळवारी आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे.

आजच्या सामन्यात विजय संपादन करून स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाटी दोन्ही संघ सज्ज आहेत. गतवर्षी आयपीएल २०२० मध्ये साखळीत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीने आरसीबीला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी आरसीबी सज्ज आहे .

आरसीबी सध्या ८ गुणांसह तिसऱ्या तर दिल्ली ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थान गाठण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे.

आरसीबीने सुरुवातीचे चार सामने जिंकून विजयी सुरुवात केली होती. पण रविवारी चेन्नई सुपरकिंग्जने आरसीबी संघाला तब्बल ६९ धावांनी पराभूत करून आरसीबीचा विजयरथ रोखला.

आता हा पराभव मागे सारून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर आपला विजय पुन्हा नोंदवण्यासाठी आरसीबी काय राणीनीती आखतो ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

मात्र आरसीबी संघाला सामन्यापूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत.

केन रिचडसन आणि ऍडम झाम्पा यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. आशा परिस्थितीत त्यांच्याजागी फिन अलेन , डॅनिअल स्लॅम्स असे दोन पर्याय आहेत. यापैकी एकाचा अंतिम ११ मध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे .

आरसीबी संघात दिल्ली कॅपिटल्स प्रमाणे फलंदाजी आणि गोलंदाजीतही विविधता आहे. त्यामुळे एक रोमांचक सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी सज्ज आहेत. आरसीबी संघाची फलंदाजी चेन्नईविरुद्ध लढतीत सपशेल अपयशी ठरली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com