राजस्थानचा 'हा' स्फोटक खेळाडू आज यूएईमध्ये होणार दाखल

राजस्थानचा 'हा' स्फोटक खेळाडू आज यूएईमध्ये होणार दाखल

राजस्थान संघाचा मार्गदर्शक शेन वॉर्नने दिली माहिती

दुबई - Dubai

राजस्थान रॉयल्स संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयपीएल खेळण्यासाठी आज यूएईमध्ये दाखल होणार आहे.

स्टोक्समुळे राजस्थानचा संघ आणखी मजबूत झाला आहे.

वडील आजारी असल्याने, बेन स्टोक्सने सुरुवातीचे काही सामने आपण खेळणार नसल्याचे, राजस्थानच्या व्यवस्थापनाला कळवले होते. आता तो आयपीएल खेळण्यासाठी यूएईमध्ये दाखल होणार आहे. राजस्थान संघाचा मार्गदर्शक शेन वॉर्नने याची माहिती दिली.

यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर बेन स्टोक्सला 6 दिवस क्वारंटाइन राहावे लागेल.

क्वारंटाइन दरम्यान, त्याच्या चाचण्या घेतल्या जातील, त्यात निगेटिव्ह आल्यानंतर त्याला बायो बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.

सध्याच्या घडीला दिल्ली कॅपिटल्स संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. यानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे बँगलोर आणि मुंबई इंडियन्सचा संघ आहे.

हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर पाचव्या स्थानावर तर सहाव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. गुणातालिकेत सातव्या स्थानावर किंग्ज इलेव्हन पंजाब आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com