
वावी | वार्ताहर
२७ व्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत(27th National Cycling Championships )राजस्थान संघ अव्वल ठरला असून उपविजेते पद महाराष्ट्र संघाने पटकावले आहे या स्पर्धेत राजस्थानने ८ सुवर्ण पदक ६ रौप्य पदक आणि ७ कांस्य पदक अशी २१ पदके मिळवत पहिलं स्थान पटकवलं. तर महाराष्ट्राने ४ सुवर्ण, २ रौप्य पदक आणि ७ कांस्य पदक अशी एकूण १३ पदकांची कमाई केली. हरयाणा संघाला ९ पदकांसह तिसरा क्रमांक मिळवता आला.
दरम्यान समृद्धी महामार्ग अर्थात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावर सुरू असलेल्या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे २७ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सलग चार दिवस चालणाऱ्या या सायकल स्पर्धेत जवळपास ३१ राज्यातून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यात त्यात राजस्थान महाराष्ट्र ,हरियाणा, दिल्ली, कर्नाटका ,तमिळनाडू ,बिहार ,ओरिसा ,झारखंड ,गुजरात तेलंगणा, पंजाब व रेल्वे स्पोर्ट प्रमोशन बोर्ड तसेच सर्विस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड अशा अनेक प्रांतातून आलेल्या जवळपास १००० स्पर्धकांनी या सायकल स्पर्धेत सहभाग घेतला होता .
तर पहिल्या दिवशी पुरुषांच्या टाईम ट्रायल स्पर्धा खेळण्यात आल्या तसेच मेन ईलाईट टाईम ट्रायल ४० किलोमीटर स्पर्धा, ३० किलोमीटर वुमन इलाईट स्पर्धा, सोळा वर्षे वयोगटातील मुलांसाठी २० किलोमीटरचा सब ज्युनिअर गट ,मुलींसाठी २० किलोमीटरचा सब ज्युनिअर गट अशा पद्धतीने आयोजन करण्यात आले होते सायकलिंग फेडरेशन ऑफ आशियाचे अध्यक्ष ओंकार सिंग यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सायकालिंग फेडरेशन ऑफ इंडियायचे खजिनदार प्रताप जाधव, महाराष्ट्र फेडरेशनचे सचिव प्राध्यापक संजय साठे, छत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता मोपलवार, तुकाराम नवले, धनंजय वानखेडे, निसर्गराज सोनवणे , पाथरे ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ व वावी येथील आरोग्य विभागाचे मनीषा देवरे व नवनाथ नवले यावेळी उपस्थितीत होते.