IPL 2022 : आज क्वालिफायर २; राजस्थान-बंगळूर आमनेसामने

IPL 2022 : आज क्वालिफायर २; राजस्थान-बंगळूर आमनेसामने

अहमदाबाद | Ahmedabad

आयपीएल १५ मध्ये (IPL 15) आज शुक्रवारी दुसरा क्वालिफायर (Qualifier) सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) संघांमध्ये होणार आहे...

आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) कोलकाता येथे झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघावर विजय संपादन करून अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं आहे.

आता आजच्या सामन्यातील विजेता रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध (GT) अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी दोन हात करणार आहे. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. राजस्थान आणि बंगळूर संघांनी यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या दोन साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय मिळवला आहे. शिवाय पहिल्या क्वालिफायर सामना पराभूत झाल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा आत्मविश्वास खालावलेला आहे.

तर दुसरीकडे साखळीतील अखेरचा सामना आणि एलिमिनेटर सामन्यातील विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला सलग तिसरा सामना जिंकण्याची मोठी संधी आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करून आयपीएल स्पर्धेतील आपली चौथी अंतिम फेरी गाठण्यासाठी बंगळूरला आज राजस्थान रॉयल्सचा सामना करायचा आहे.

दोन्ही संघांमध्ये अनेक मॅचविनर खेळाडू असल्यामुळे आजचा सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाही. ऑरेंज कॅप लीडर जोस बटलर आणि पर्पल कॅप होल्डर फिरकीपटू युझवेन्द्र चहल या जोडीमुळे आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचं विजयसाठीचं पारडं जड मानलं जात आहे.

मागील ५ सामन्यांच्या निकालांवर एक नजर टाकल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने ४ तर राजस्थान रॉयल्स संघाने १ सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात जोस बटलर, संजू सॅमसन, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, जोश हेझलवूड हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com