IPL 2022, RR vs RCB : बंगळूरू विजयाची 'सेन्चुरी' मारणार?

File Photo
File Photo

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) या संघांमध्ये सामना सायंकाळी ७:३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) खेळवण्यात येणार आहे...

बंगळूर संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये (IPL) ९९ विजय नोंदवले आहेत. आजच्या सामन्यात राजस्थानला पराभवाची धूळ चारल्यास हा बंगळूर संघाचा १०० वा विजय असणार आहे.

यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघांनी १०० सामन्यांमध्ये विजय साकारला आहे.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स (RR) संघाने यंदाच्या हंगामात संजू सॅम्सनच्या नेतृत्वामध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. मुंबई इंडियन्स, आणि सनरायझर्स हैद्राबाद संघांना पराभवाची धूळ चारल्यानंतर आता बंगळूर विरुद्ध राजस्थान विजय साकारून स्पर्धेतील आपल्या विजयाची हॅट्रिक करण्याच्या इराद्याने राजस्थानचा संघ आज मैदानात उतरणार आहे.

राजस्थान (RR) आणि बंगळूर (RCB) आतापर्यंत एकूण २५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात राजस्थान रॉयल्स संघाने १० तर बंगळूरने १२ सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे तर ३ सामने अनिर्णयीत ठरले आहेत. गत ५ सामन्यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास बंगळूरने ४ तर राजस्थान रॉयल्स संघाला १ विजय नोंदवता आला आहे.

बंगळूर संघाबद्दल सांगायचे झाल्यास अनुज रावतला आपल्या खेळात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिसला मागील २ सामन्यांमध्ये केवळ १ अर्धशतक साकारता आले आहे. त्यामुळे त्याला मोठी खेळी साकारून जवाबदारीने खेळ करावा लागणार आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीकडून (Virat Kohli) संघाला मोठी खेळी अपेक्षित आहे.

गोलंदाजीत केकेआरविरुद्ध (KKR) झालेल्या स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत अष्टपैलू वनिंदूं हंसरंगा याने कोलकाताच्या प्रमुख फलंदाजांना बाद करून बंगळूरच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. मात्र मोहंमद सिराजला अद्याप आपल्या गोलंदाजीत सूर गवसलेला नाही ही संघासाठी चिंतेची बाब आहे.

मुंबईविरुद्ध (Mumbai) मागील सामन्यात जोस बटलरने शानदार शतक ठोकून आपण लयीत असल्याचे दाखवून दिले आहे. कर्णधार संजू सॅमसन सलामी सामन्यात हैद्राबादविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकून आपल्यालाही लय गवसली असल्याचे दाखवून दिले होते. मात्र सलामीवीर यशस्वी जयस्वालची बॅट अद्यापही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतेय. त्याला अधिक जवाबदारीने खेळ करावा लागणार आहे.

गोलंदाजीचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी बंगळूरच्या तुलनेत अधिक मजबूत आणि धोकादायक आहे. संघात ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा, आर अश्विन आणि लेगस्पिनर फिरकीपटू युझवेन्द्र चहल हे सर्वच गोलंदाज प्रतिस्स्पर्धी संघावर चांगलाच हल्लाबोल करत आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com