IPL 2022 : राजस्थान-गुजरात विजयी चौकारासाठी सज्ज

IPL 2022 : राजस्थान-गुजरात विजयी चौकारासाठी सज्ज

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज गुजरात टायटन्स (gujarat titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये सायंकाळी ७:३० वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर सामना होणार आहे. राजस्थान (RR) आणि गुजरात (GT) संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.....

राजस्थान रॉयल्स ४ सामन्यांमध्ये ३ विजय आणि १ पराभवासह ६ गुणांनी सरस धावगतीच्या बळावर गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आता गुजरातवर विजय मिळवून विजयी चौकरासाठी राजस्थान रॉयल्स संघाला आज विजय आवश्यक असणार आहे.

तर दुसरीकडे सलगचे ३ सामने जिंकून आयपीएलमध्ये (IPL) दणक्यात सुरुवात करणारा गुजरात टायटन्स आजच्या सामन्यात विजय नोंदवून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

दोन्ही संघांची तुलना केल्यास राजस्थान रॉयल्स अधिक संतुलित संघ दिसत आहे. कारण संघातील सर्व खेळाडू उत्तम लयीत आहेत. शिवाय सलामीवीर यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरकडे ऑरेंज कॅप (Orange Cap) कायम आहे. मागील ४ सामन्यांमध्ये त्याला केवळ मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) एकच मोठी खेळी करता आली आहे.

शिवाय कर्णधार संजू सॅमसन, देवदत्त पडिकल यांनाही आज गुजरातविरुद्ध सामन्यात मोठी खेळी करावी लागणार आहे. शिमरॉन हेटमायरने मागील ४ सामन्यांमध्ये उत्तम फलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास फिरकीपटू युझवेन्द्र चहल, ट्रेंट बोल्ट प्रचंड लयीत आहेत. आर अश्विन, प्रसिध कृष्णाकडून संघाला चांगले प्रदर्शन अपेक्षित असणार आहे.

गुजरात टायटन्सकडे (GT) राजस्थान रॉयल्सप्रमाणे (RR) चांगली फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी आहे. मात्र सलामीवीर शुभमन गिलची लय वगळता एकही फलंदाज आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीतून चमक दाखवू शकलेला नाही. कर्णधार हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com