राजस्थान, सनरायझर्स आज सामने सामने

राजस्थान,  सनरायझर्स आज सामने सामने

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आज सनराईझर्स हैद्राबाद (sunrisers hyderabad) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर (Dubai international cricket ground) खेळवण्यात येणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स (Star Sports) आणि हॉटस्टार (Hot Star) वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या बाद फेरीच्या शर्यतीत चेन्नई सुपरकिंग्ज (Chennar Super kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघानं आपला प्रवेश निश्चित केला आहे. राजस्थान रॉयल्स संघासाठी बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या दृष्टीनं हा सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थान संघानं रॉयल विजय साकारल्यास त्यांना गुणतालिकेत सहाव्या स्थानावरून थेट चौथे स्थान गाठण्याची संधी आहे.

राजस्थान संघाची कामगिरी यंदाच्या आयपीएल हंगामात तळ्यात मळ्यात अशी राहिली आहे. ९ सामन्यांमध्ये संघानं ४ विजय आणि ५ पराभवांसह ८ गुणांची कमाई केली आहे. गत सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं अबुधाबी येथे झालेल्या राजस्थान रॉयल्स संघावर ३३ धावांनी मात केल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाची अडचण वाढली आहे. बाद फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी राजस्थान संघाला ५ सामन्यांमध्ये ४ विजय मिळवणे गरजेचे आहे.

दिल्ली संघाविरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाच्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीत चमकदार कामगिरी करून दिल्ली संघाला १५७ धावांवर रोखले. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं क्रिस मॉरीस , आणि इविन लुईस यांना विश्रांती दिली होती. त्यांच्याजागी संघात संधी मिळालेल्या डेविड मिलर आणी तेहबाज शम्सी यांना संघात संधी देण्यात आली होती. मात्र १५७ धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात ६ बाद २ अशी बिकट अवस्था झाली असताना कर्णधार संजू सॅमसन याने शानदार अर्धशतक झळकावले होते. मात्र त्याला इतर फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे राजस्थान संघाला पराभूत व्हावे लागले होते.

तर दुसरीकडे पंजाबकिंग्ज विरुद्ध शारजा येथे झालेल्या सामन्यात हैद्राबाद गोलंदाजांनी पंजाबकिंग्ज संघाला २० षटकात ७ बाद १२५ धावांवर रोखलं होतं. या सामन्यात अष्टपैलू जेसन होल्डरची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. या सामन्यात त्यानं ३ महत्वपूर्ण विकेट्स काढून नाबाद ४७ धावांची खेळी करत संघाला विजयासमीप पोहोचवलं होतं.

मात्र डेविड वॉर्नर , मनीष पांडे , केन विलियम्सन हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले होते. यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा आणि जेसन होल्डर वगळता इतर सर्व फलंदाजांनी हाराकिरी पत्करली होती. या पराभवामुळे हैद्राबाद संघाचे बाद फेरीच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आलं आहे आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतून यंदाच्या विवो आयपीएल २०२१ मध्ये विजयी शेवट गोड करण्यात हैद्राबाद यशस्वी ठरणार का ? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.