विजयी षटकारासाठी राजस्थान-बंगळूर सज्ज

विजयी षटकारासाठी राजस्थान-बंगळूर सज्ज

पुणे | Pune

आयपीएल १५ (IPL 15) मध्ये आज सायंकाळी ७:३० वाजता राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) संघाचा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर (Maharashtra cricket association ground pune) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरशी होणार आहे....

यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan royals) जोस बटलर आणि फिरकीपटू युझवेन्द्र चहल राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) संघाचा विजयी षटकार निश्चित करण्यासाठी उत्सुक आहे.

आज दोन्ही रॉयल्स (Rajasthan royals) विजय संपादन करण्यासाठी मैदानात उतरतील आजच्या सामन्यात राजस्थानला विजयासाठी फेव्हरेट मानलं जात आहे. मात्र असे असले तरी राजस्थान संघाची कामगिरी बंगळुरविरुद्ध निराशाजनक राहिली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल १५ मधील पहिल्या साखळी सामन्यात बंगळूरने राजस्थानचा पराभव केला होता .

या पराभवाची परतफेड करण्यासाठी राजस्थान संघाला आज बंगळुरविरुद्ध रॉयल विजयाची संधी आहे. राजस्थान आणि बंगळूर संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या २६ सामन्यांमध्ये राजस्थान संघाला १० सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर मागील झालेल्या ५ सामन्यात ५ सामन्यात बंगळूरने बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थानला विजयासाठी फार म्हेहनत करावी लागणार आहे.

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळूर संघाला आपल्या गोलंदाजीत अधीक सुधारणा करण्याची गरज आहे. शिवाय बंगळूर गोलंदाजांपुढे जोस बटलरला झटपट बाद करणं हे पहिलं टार्गेट असणार आहे.

जोश हेझलवूड, वनिंदूं हसरंगा आणि हर्षल पटेलने उत्तम गोलंदाजी केली आहे. माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार फाफ डू प्लेसिस अद्याप आपल्या फलंदाजीतून अपेक्षेनुसार फलंदाजी करू शकलेले नाहीत. त्यांच्याकडून मोठी खेळी संघाला अपेक्षित असणार आहे.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) संघाचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos battler) आता बंगळूरच्या (Bangalore) गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यासाठी सज्ज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये जोस बटलरने ३ शानदार शतके झळकावली आहेत. आजच्या सामन्यातही त्याच्याकडून शतकी खेळी राजस्थानला अपेक्षित असणार आहे. पुण्याच्या मैदानावर राजस्थान (Rajasthan royals) आणि बंगळूर संघांनी प्रत्येकी १ सामना खेळला आहे दोन्ही संघाना या सामन्यात विजयाची नोंद करता आली आहे.

स्टार प्लेअर्स : फाफ डू प्लेसिस , ग्लेन मॅक्सवेल , जोस बटलर , संजू सॅमसन.

सलिल परांजपे ,नाशिक

Related Stories

No stories found.