पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर

पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर

मुंबई | Mumbai

भारताची दोन ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेतली आहे. सिंधूने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.

‘‘राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे माझ्या आशा उंचावल्या होता. मात्र, दुर्दैवाने पायाच्या दुखापतीमुळे मला जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागते आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीपासूनच पायाला वेदना जाणवत होत्या. हैदराबादला परतल्यावर तातडीने ‘एमआरआय’ चाचणी करून घेतली. त्यात डाव्या पायाची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे,’’ असे सिंधू म्हणाली.

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा 2022 टोकियो येथे 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने नुकतेच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये कॅनडाच्या मिशेल लीचा 21-15, 21-13 असा पराभव करत तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com