पंजाब किंग्जसमोर आज सनरायझर्स हैदराबादचे आव्हान

पंजाब किंग्जसमोर आज सनरायझर्स हैदराबादचे आव्हान

शारजा | sharjah

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आज शनिवारी (Saturday) दुसरा सामना पंजाबकिंग्ज विरुद्ध सनराईझर्स हैद्राबाद (Punjab Kings Vs Sunrisers Hyderabad) संघाचं आव्हान असणार आहे. हा सामना शारजा मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. बाद फेरीच्या शर्यतीत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही अखेरची संधी असणार आहे....

पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाच्या खात्यात ६ गुण जमा असून, गुणतालिकेत ते सातव्या स्थानावर आहेत. हैद्राबाद (Hyderabad) संघावर मात करून विजयी चौकार मारण्यासाठी राहुल अँड कंपनी सज्ज आहे.

दोन्ही संघांमध्ये अनेक म्याचविनर खेळाडू असल्यामुळे सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. सनराईझर्स हैद्राबाद संघाला बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आपले उर्वरीत सर्व ६ सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे . जेणेकरून हैद्राबाद संघाची धावगती इतर संघांच्या तुलनेत अधिक सरस ठरू शकेल.

हैद्राबाद आणि दिल्ली यांच्यात दुबई येथे झालेल्या सामन्यात हैद्राबाद संघाची फलंदाजी कमकुवत ठरली होती. हैद्राबाद संघाचे आघाडीचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यांना आपली कामगिरी सुधारणे गरजेचे आहे. वृद्धिमान सहा , डेविड वॉर्नर , केन विलियम्सन , मनीष पांडे या सर्व फलंदाजना आपला खेळ उंचवावा लागणार आहे. तर गोलंदाजीत संदीप शर्मा , भुवनेश्वर कुमार , खलील अहमद आणि रशीद खान यांच्याकडून चमकदार कामगिरी संघाला अपेक्षित आहे.

पंजाब किंग्ज संघाबद्दल सांगायचे झाले तर कर्णधार लोकेश राहुल , आणि मयंक अगरवाल चांगल्या फॉर्मात आहेत. गत सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब संघाच्या इतर फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे पंजाबकिंग्ज संघाचा अनपेक्षित पराभव झाला होता. या चुका सुधारून हैद्राबादविरुद्ध नव्या उमेदीनं मैदानात उतरण्यासाठी पंजाब सज्ज आहे. शिवाय या सामन्यात अनुभवी स्फोटक फलंदाज क्रिस गेलला विश्रांती देण्याची चूक पंजाबकिंग्ज हैद्राबाद सुधारणार का? ते पाहणे महत्वाचं असणार आहे.

मात्र संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे अर्शदिपसिंग आणि मोहंमद शमी यांनी केलेल्या अचुक आणि भेदक माऱ्यामुळे पंजाबने राजस्थान संघाला २० षटकात रोखलं होतं. आजच्या सामन्यात या दोन्ही गोलंदाजांकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. गतवर्षी दुबई येथे झालेल्या सामन्यात पंजाबने हैद्राबाद संघाला २० षटकात १२६ धाव उभारून १४ धावांनी पराभूत केलं होतं. तर आयपीएल २०२१ च्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई येथे झालेल्या सामन्यात हैद्राबाद संघानं यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली होती. आता पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी हैद्राबाद कशी कामगिरी करतो. ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.