मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेत नाबाद दीडशतकीय ‘प्रेम’

मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेत नाबाद दीडशतकीय ‘प्रेम’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे (Nashik District Cricket Association) सुरू असलेल्या मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेत नाशिक क्रिकेट असोसिएशन (मॉर्निग)च्या संघाचा फलंदाज प्रेम देवरे (Prem Deore) याने केलेल्या नाबाद दिडशतकाच्या जोरावर आई तुळजाभवानी क्रिकेट क्लबला तब्बल 142 धावांनी पराभूत केले…

येथील अनंत कान्हेरे मैदानावर खेळविण्यात आलेल्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए) (मॉर्निंग) या बारा वर्षाआतील संघाने निर्धारीत 30 षटकात 6 बाद 244 धावा केल्या.

यात प्रेम देवरे या फलंदाजाने 30 चेंडूंमध्ये 30 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 166 धावा केल्या. तब्बल तीन तास मैदानावर राहात या फलंदाजाने उपस्थितांचे मने जिंकून घेतली. कृतिका पाटील हिने 10 धावा केल्या.

तर लौकिक नागले, तेजस दातरे, लुणावत, अपूर्वा गुप्ता, अन्वी तैयपई आदित्य पाटील यांनी प्रेम देवरे याला चांगली साथ दिली. 9 वर्षाच्या तेजस दातरे यानेही टिच्चून फलंदाजी केली तर मोहिनी कुलकर्णी हिने उत्कृष्ट यष्टीरक्षण केले.

फलंदाजीस उतरलेल्या आई तुळजाभवानी क्लबतर्फे अंश देशमुख याने सर्वाधिक 43 धावा केल्या. हा संघ 102 धावांत गारद झाला. एनडीसीए मॉर्निंगतर्फे अस्मिता खैरनार हिने 6 षटकात 4 निर्धाव टाकत अवघ्या तीन धावा देत दोन गडी बाद केले.

तर कृतिका पाटील हिने 6 षटकांमध्ये 34 धावा देत दोन गडी बाद केले. प्रेम देवरे याने अष्टपैलू कामगिरी करीत 21 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. विजेता संघाचे प्रशिक्षक वैभव नाकील, मंगेश शिरसाठ, विजय कपूर, विजय पगारे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.