राज्यस्तरीय रोइंग स्पर्धेत नाशिकला तीन 'सुवर्ण'

राज्यस्तरीय रोइंग स्पर्धेत नाशिकला तीन 'सुवर्ण'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या (Maharashtra Rowing Association) वतीने पुणे (Pune) येथे झालेल्या राज्यस्तरीय रोइंग चॅम्पियनशिपमध्ये (State Level Rowing Championship) नाशिकच्या खेळाडूंनी सुवर्णपदक (Gold Medal) मिळविले आहे...

या स्पर्धा दि. १९ ते २२ मे दरम्यान पुणे येथील रोइंग नोड येथे झाल्या. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ५०० मी. सिंगल आणि डबल स्कल प्रकारात नाशिकच्या दत्तू भोकनळ स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

राज्यस्तरीय रोइंग स्पर्धेत नाशिकला तीन 'सुवर्ण'
आता शेतकऱ्यांचे सोशल मिडियावर 'कमेंट्स आंदोलन'

याबाबत अधिक माहिती देताना दत्तू भोकनळ स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे संचालक अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ (Dattu Bhokanal) यांनी सांगितले की, अवघ्या तीन महिन्यांच्या सरावाच्या जोरावर इन्स्टिट्यूटमधील कृष्णा रवींद्र शेळके (सिंगल स्कल), धनंजय सुभाष निकम (डबल स्कल), पंकज विश्राम वाढ (डबल स्कल) यांनी सुवर्णपदकाची (Gold Medal) कमाई केली आहे. आता त्यांची निवड जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या चॅलेंजर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com