हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाशिकच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाशिकच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयोजित गुवाहाटी येथे चालू झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील हिमाचल प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र या पहिल्या सामन्यात नाशिकच्या क्रिकेटपटू माया सोनवणे (Maya Sonawane) व रसिका शिंदे (Rasika Shinde) यांनी चमकदार कामगिरी केली...

हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करत ९ बाद २४२ धावा केल्या. महाराष्ट्र संघातर्फे फिरकीपटू माया सोनवणेने १० षटकांत ५४ धावा देत ३ गडी बाद केले. आरती केदार व एम. आर. मगरेने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल कर्णधार एस. एस. शिंदेच्या अर्धशतकानंतरही महाराष्ट्र संघाची ५ बाद ९८ अशी स्थिति झाली.

हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाशिकच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
अभिनेत्री राखी सावंतला अटक

सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रसिका शिंदेने ४४ चेंडूत १ षटकार व ३ चौकार मारत ३० धावा केल्या व आठव्या विकेटसाठी एस बी पोखरकर बरोबर ४१ धावांची भागीदारी केली.

तरीही महाराष्ट्र संघ ९ बाद १८० पर्यंतच मजल मारू शकल्यामुळे हिमाचल प्रदेश ६२ धावांनी विजयी झाले. माया सोनवणे व रसिका शिंदे यांची कामगिरी महाराष्ट्राचा पराभव टाळू शकली नाही.

हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाशिकच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
Video : 'त्यांनी' जिद्दीने विस्तारला शेतीचा पट; 'पाहा' शेतकरी महिलेची यशोगाथा

गुवाहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित, या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत.

२१ जानेवारी - विदर्भ, २३ जानेवारी - हैद्राबाद, २५ जानेवारी - गोवा,  २७ जानेवारी - बिहार  व २९ जानेवारी - उत्तराखंड.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com