IPL21 : पंजाबकिंग्जसमोर आज बंगळूरचे रॉयल चॅलेंज

IPL21 : पंजाबकिंग्जसमोर आज बंगळूरचे रॉयल चॅलेंज

अहमदाबाद | Ahamadabad

आयपीएल २०२१ मध्ये आज शुक्रवारी पंजाबकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सामना होणार आहे.

आयपीएल २०२१ मध्ये आपलं आव्हान कायम राखण्यासाठी पंजाबला विजय मिळवणे आवश्यक असणार आहे. बंगळूर संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे.

पंजाबवर विजय संपादन करून विजयी षटकार मारण्यासाठी बंगळूर सज्ज आहे. चेन्नईविरुद्ध ६९ धावांनी पत्कारलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर दिल्लीवर अवघ्या १ रनने विजय संपादन करून बंगळूरने आपली गाडी पुन्हां रुळावर आणली आहे. आता हीच विजयी लय कायम ठेवण्याचा बंगळूर संघाचा मानस असणार आहे.

बंगळुरविरुद्ध सामन्यात पंजाब संघामध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. निकोलस पुरण मागील सामन्यांमध्ये फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला आहे. त्याच्याजागी टी २० क्रिकेट क्रमवारीत अव्वल असणारा इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

पंजाब आणि बंगळूर यांच्यात आतापर्यंत झालेल्या २६ सामन्यांमध्ये बंगळूरने १२ तर पंजाबने १४ लढतींमध्ये विजय साकारला आहे. दुबईमध्ये झालेल्या २ सामन्यांमध्ये गतवर्षी पंजाबने बंगळुरवर सहज मात केली होती. ही विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी राहुल अँड कंपनी सज्ज झाली आहे.

बंगळूर आणि पंजाबची फलंदाजी मजबूत आहे. एका बाजूला एबीडी , विराट कोहळी आणि ग्लेन मॅक्सवेल आहेत. तर दुसरीकडे लोकेश राहुल , गेल आणि मयंक अगरवाल असे आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे एक काटे की टक्कर पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना आहे. दोन्ही संघांच्या गोलंदाजीची तुलना केल्यास बंगळूरचा संघ अधिक सरस दिसत आहे.

चेन्नईविरुद्ध आणि दिल्लीविरुद्ध बंगळूरचे सलामी फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. मात्र मधल्या फळीतील फलंदाज अब्राहाम डिव्हिलिअर्स याने झळकावलेल्या झुंजार अर्धशतकामुळे बंगळूरला दिल्लीविरुद्ध १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. त्यामुळे डिव्हिलिअर्सला झटपट तंबूत पाठवण्यात पंजाबचे गोलंदाज यशस्वी होणार का ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्याचप्रमाणे युनिव्हर्स बॉस क्रिस गेलची बॅट कधी तळपणार ? असा प्रश्न पंजाब संघांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे. एका बाजूला डिव्हिलिअर्सचे वादळ आणि दुसरीकडे क्रिस गेल स्ट्रॉम त्यामुळे आज कोणतं वादळ घोंगावणार क्रिस गेलचं की , अब्राहाम डिव्हिलिअर्सचं चला तर मग बघूया.

- सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com