
नवी दिल्ली | New Delhi
चीनमधील हांगझू (Hangzhou in China) येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये (Asian Para Games) भारताने इतिहास रचला आहे. भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदा शंभरपेक्षा जास्त पदकं जिंकत आपली मोहीम यशस्वीरित्या संपुष्टात आणली. भारतीय पॅरा अॅथेलिट्सने (Para Athletes) १११ पदकं जिंकली असून यात २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांचा समावेश आहे...
याआधी २०१० मध्ये ग्वांग्झूत झालेल्या अशियाई पॅरा गेम्समध्ये १४ पदकं जिंकत भारत १५ व्या स्थानावर होता. त्यानंतर २०१४मध्ये भारत पदक तालिकाच्या यादीत १५ व्या स्थानी होता. तर २०१८ मध्ये भारत ९ व्या स्थानी होता. दरम्यान भारताने तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये १०० पेक्षा जास्त पदकं जिंकली असून याअगोदर २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) देखील १०१ पदकं जिंकली होती.
तर भारताने हांगझू येथे २३ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या एशियन गेम्समध्ये १०७ पदके जिंकत मोठी कामगिरी केली होती. मात्र, अशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी हा माईल स्टोन देखील मागे टाकला. भारत पदक तालिकेत पाचव्या स्थानावर राहिला आहे.
तसेच हांगझू येथील अशियाई पॅरा गेम्समध्ये चीनने सर्वाधिक ५२१ पदके जिंकली असून यात २१४ सुवर्ण, १६७ रौप्य आणि १४० कांस्यपदके जिंकली आहेत. तर पदक तालिकेत इराण १३१ पदके (४४ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ४१ कांस्य) जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय जपानने ४२ सुवर्ण ४९ रौप्य आणि ५९ कांस्य पदके जिंकली आहेत. तर कोरियाने ३० सुवर्ण, ३३ रौप्य आणि ४० कांस्य पदके जिंकली आहेत.