पाकिस्तानचा माजी अष्टपैलू व कर्णधार मोहम्मद हाफिज निवृत्त

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू व कर्णधार मोहम्मद हाफिज निवृत्त

लाहोर | Lahor

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू क्रिकेटर मोहंमद हाफिज (Mohammad Hafeez) याने सोमवारी आपल्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी पाकिस्तान सुपर लीगच्या नवीन हंगामासाठी लाहोर कलंदर्स संघाकडून हाफिज करारबद्ध झाला आहे. ४१ वर्षीय हाफिज मात्र फ्रँचायझी क्रिकेटसाठी उपलब्ध असणार आहे....

दरम्यान, याबाबत त्याने कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट केलेली नाही. २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून तो निवृत्त झाला होता. त्याने आजवर पाकिस्तानसाठी ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून , यात त्याने १२,७८९ धावा करताना २५३ विकेट्स काढल्या आहेत. यामध्ये ५५ कसोटी सामने , २१८ एकदिवसीय आणि ११९ टी २० सामन्यांचा समावेश आहे.

हाफिजने ३ ५० षटकांच्या विश्वचषक आणि ६ टी २० वर्ल्डकप स्पर्धांमध्ये पाकिस्तानचं प्रातिनिधीत्व केलं आहे. त्याने २००३ मध्ये आपला पहिला एकदिवसीय सामना झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) खेळला होता. तर अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना (International c नुकत्याच २०२१ मध्ये यूएईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला उपांत्य सामना हा त्याचा अखेरचा सामना ठरला. विशेष गोष्ट म्हणजे तब्बल ३२ वेळा त्याला सामनावीर किताबाने गौरवण्यात आले होते.

चंदा प्रोफेसर (Chanda Professor) या टोपणनावाने तो ओळखला जातो हाफिजने आपला पहिला कसोटी क्रिकेट (First cricket match) सामना २००३ मध्ये बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) तर अखेरचा सामना २०१८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळला होता.

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचा जर्सी क्रमांक ८ आहे. त्याने आपला पहिला टी २० सामना इंग्लंडविरुद्ध (England) २००६ मध्ये खेळला होता. २००८ मध्ये आयपीएलच्या (IPL) उदघाटन सत्रात तो कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Night riders) संघाकडून खेळला होता. त्याने २९ टी २० सामन्यांमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलं आहे. यात त्याने १७ सामन्यात विजय तर ११ सामने गमावले आहेत.

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com