
मुंबई | Mumbai
आशिया चषकाच्या (Asia Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी आशिया चषकाचे संयुक्त यजमानपद भूषवित असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातून एक बातमी समोर आली आहे...
पाकिस्तान संघाचा स्टार गोलंदाज शाहिनशाह आफ्रिदी नेपाळ विरुध्द सलामीच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. नेपाळ विरुध्द अवघ्या ५ षटकांचा खेळ संपल्यावर त्याला मैदान सोडावं लागलं होतं.
यावेळी पाकिस्तान संघाचे फिजिओ मैदानावर उपस्थित होते. काही वेळानंतर तो मैदानावर परतला पण त्याने गोलंदाजी केली नाही. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच आफ्रिदीला झालेली दुखापत हा पाकिस्तान संघासाठी चिंचेचा विषय बनला आहे.
सलिल परांजपे, नाशिक.