निफाड @१० अंश सेल्सियस; नाशिकचाही पारा १२ अंशांवर

निफाड @१० अंश सेल्सियस; नाशिकचाही पारा १२ अंशांवर

निफाड थंड राहण्याची ही आहेत कारणे...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

निफाडसह (Niphad) नाशिक (Nashik) जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून आज निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये १० अंश सेल्सियस तर नाशिकमध्ये किमान तापमान १२.५ अंश सेल्सियस तपमानाची नोंद झाली.....

नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला आहे. गतवर्षी येथील किमान तापमान चार अंशांपर्यंत गेले होते. यंदाही नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच निफाड तालुकावासीयांना गारठा चांगलाच झोंबताना दिसून येत आहे. (mercury down in Niphad)

नाशिक शहरात काल (दि ११) रोजी १२.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. तर आज किंचितशी वाढ होऊन आज तपमानाचा पारा १२.५ अंशांवर स्थिरावला.

...म्हणून निफाड सर्वात थंड

निफाडच्या भौगोलिक स्थानामुळे हिवाळ्यात ते महाबळेश्वरपेक्षा (Mahabaleshwar) थंड होत असते. हिवाळ्यात उत्तर व वायव्य दिशेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांच्या प्रवाहाच्या मार्गावर निफाड येते.

छोट्या छोट्या टेकड्यांच्या मध्ये सखल भागात निफाड तालुका (Niphad Taluka) वसला आहे. त्यामुळे या टेकड्यांवरील थंड हवा सखल भागात जमा होते. हिवाळ्यात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, थंड वाऱ्यांमुळे या परिणामाची तीव्रता वाढते.

आकाश जेवढे निरभ्र तेवढे जमिनीतले उष्णतेचे उत्सर्जन अधिक. निफाडभोवतीच्या टेकड्यांवरील उष्णतेचे उत्सर्जन झाल्यानंतर निर्माण झालेली थंड हवा सखल भागाकडे येते व पारा घसरतो असे तज्ञ तत्ज्ञ सांगतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com