न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड आज लढत

न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड आज लढत

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट (ICC T20 World Cup Cricket) स्पर्धेत आज बुधवारी दोन हायहोल्टेज मुकाबले रंगणार आहेत. पहिला सामना दुबईच्या मैदानावर दुपारी ३:३० वाजता न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे....

पहिल्या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताविरुद्ध न्यूझीलंड सहज सामना पराभूत होईल असे भारतीय संघाच्या चाहत्यांना वाटत होते. मात्र न्यूझीलंड संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर दमदार प्रदर्शन करत भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये पराभवाची धूळ चारून आपल्याला विजयी लय परत मिळाली असल्याचे सहज दाखवून दिले होते.

आज दुबईमध्ये स्कॉटलंड (Scotland) संघाला पराभूत करून उपांत्य फेरीसाठी आपलं तिकीट जवळपास निश्चित करण्याच्या इराद्याने न्यूझीलंड संघ आज मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंड संघाचे पाकिस्तान आणी भारत या मजबूत संघांशी सामने झाले आहेत

आता आपल्या उर्वरीत ३ सामन्यांमध्ये स्कॉटलंड (Scotland), नामिबिया (Namibiya) , अफगाणिस्तान (Afghanistan) संघाशी न्यूझीलंडचे सामने होणार आहेत. या तीन संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास अफगाणिस्तान संघ यंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रचंड फॉर्मात असल्यामुळे अफगाण संघाकडून न्यूझीलंड संघाला कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे.

तर स्कॉटलंडच्या विजयाने दुसऱ्या गटामध्ये दुसऱ्या स्थानानासाठी अधिक उलटफेर होण्याची शक्यता आहे. स्कॉटलंड आणि न्यूझीलंड संघाची तुलना केल्यास न्यूझीलंड संघ अधिक संतुलित दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com