भारत- श्रीलंका मालिकेचं नव वेळापत्रक जाहीर

या नव्या खेळाडूंना संधी
भारत- श्रीलंका मालिकेचं नव वेळापत्रक जाहीर

कोलंबो | Colombo

भारत विरुद्ध श्रीलंका (Ind vs Sl) यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला (One Day Series) १३ जुलैपासून सुरुवात होणार होती. पण अचानक श्रीलंकेच्या संघात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यामुळे मालिका १७ जुलैपासून सुरु होईल असे बोलले जात होते. मात्र मालिकेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल (Changes In Timetable) करण्यात आला आहे.

आता ही मालिका १८ जुलैपासून सुरु होणार आहे. एकदिवसीय सामने (One Day Matches) १८,२०,२३ जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. तर टी २० सामने २५, २७, २९ जुलै रोजी होणार आहेत. बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह यांनी स्वतः याबाबत घोषणा शनिवारी केली आहे.

श्रीलंका क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर (Coach Grandi Flower) यांची करोना चाचणी सकारात्मक (Corona Test Positive) आढळून आली. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघाचे डाटा विश्लेषक जीटी निरोशन (Data Analyst Giti Niroshan) यांची कोरोना चाचणी सकारात्मक आढळून आली.

कोलंबो (Colombo) येथे श्रीलंका क्रिकेट संघाने (SL Team) आपले दोन संघ तयार करून तयार ठेवले होते. यातील दुसऱ्या संघातील एका खेळाडूची करोना चाचणी सकारात्मक आढळून आल्यामुळे भारत श्रीलंका मालिकेचं पुढं काय होणार ? यासारख्या अनेक चर्चा सुरु झाल्या. मात्र काल रविवारी श्रीलंका संघातील सर्व खेळाडूंची पुन्हा एकदा करोना चाचणी नकारात्मक आढळून आल्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाला आता मालिकेसाठी मैदानावर सराव (Net Practice) करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका आता होणार यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

श्रीलंका क्रिकेट संघ लवकरच आगामी भारताविरुद्ध (India Tour Shreelanka) मालिकेसाठी येत्या एक -दोन दिवसात आपल्या संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी मालिकेसाठी शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मार्गदर्शनाखाली आपली कामगिरी उंचावण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

भारतीय संघ

शिखर धवन, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, यजुवेन्द्र चहल, राहुल चाहर, दीपक चाहर, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कृष्णाप्पा गौतम, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.

- सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com