टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; आणखी एक फास्ट बॉलर जखमी...

टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; आणखी एक फास्ट बॉलर जखमी...

मुंबई | Mumbai

टीम इंडियाचे अनेक वेगवान गोलंदाज गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंज देतायत. नुकतं हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह दुखापतीतून बरे होऊन संघात परतले आहेत. दरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. आणखी एक वेगवान गोलंदाज जखमी झाला आहे. हा खेळाडू त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप संनीला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. न्यूझीलंड अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना बेंगलोरमध्ये खेळला जात जात आहे. या सामन्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघ घोषित केला होता.

बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार नवदीप सैनीला उजव्या बाजूला ग्रोइन एंजरी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या दिलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याला ही दुखापत झाल्याचे सांगितले गेले आहे. दुखापतीमुळे तो या सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच न्यूझीलंड अ संघाविरुद्ध देखील तो खेळू शकणार नाहीये. भारताच्या नवड समितीने या मालिकेसाठी सैनीच्या बदली खेळाडूच्या रूपात ऋषी धवन याला संघात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com